एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bell Bottom Teaser : स्पाय एजंटच्या भुमिकेत अक्षय कुमार; 'बेलबॉटम' चा टीझर रिलीज
'बेल बॉटम' या चित्रपटाची शुटींग दोन शेड्युलमध्ये पूर्ण करण्यात आली. चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच, 2 एप्रिल 2021 रोजी रिलीज करण्यात येणार आहे.
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'बेल बॉटम'चा टीझर लॉन्च झाला आहे. टीझरमध्ये केवळ अक्षय कुमार दिसत आहे. अक्षय सूट घातला असून त्याने काळा चश्मा लावला आहे. टीझरमध्ये अक्षय कुमार विमानांच्या आजूबाजूला चालताना दाखवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त अक्षय कुमारचा एक स्टंट सीनही आहे. अक्षय एका टँकरवर उभा असलेला दिसत आहे.
'बेल बॉटम'चा टीझर शेअर करत अक्षय कुमारने लिहिलं आहे की, 'हा आहे 'बेल बॉटम'. हा एक 80 च्या दशकातील थ्रिलिंग थ्रोबॅक आहे. सादर करत आहे 'बेल बॉटम'चा टीझर.' टीझरच्या शेवटी सांगण्यात आलं आहे की, चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच, 2 एप्रिल 2021 रोजी रिलीज करण्यात येणार आहे. याचसोबत अक्षय कुमारने हा टीझर शेअर करताना चित्रपटातील इतर सेलिब्रिटींनाही टॅग केलं आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत वाणी कपूर, हुमा कुरैशी आणि लारा दत्ता भूपति महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
लॉकडाऊनमध्येच पूर्ण केली शुटींग 'बेल बॉटम' चित्रपटाची शुटींग संदर्भात एक खास गोष्ट म्हणजे की, लॉकडाऊनमध्ये शुटींग सुरु करण्यात आली. तसेच संपूर्ण शुटींग जवळपास एक ते दीड महिन्यांतच पूर्ण झाली. त्यानंतर या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. चित्रपटाची डबिंग आणि एडिटिंगवर काम सुरु आहे. अक्षय कुमार स्टारर हा चित्रपट डिटेक्टिव्ह फिल्म आहे. या चित्रपटाची पटकथा 80च्या दशकातील आहे. चित्रपटात अक्षय एका सीक्रेट एजंटची भूमिका साकारणार आहे. डबल शिफ्टमध्ये पूर्ण केली शुटिंग दरम्यान, 'बेल बॉटम' या चित्रपटाची शुटींग दोन शेड्युलमध्ये पूर्ण करण्यात आली. पहिल्या शेड्यूलमधी शुटींग स्कॉटलँडमध्ये पार पडली. आंतरराष्ट्रीय कोविड-19 नियमांनुसार, येथे शुटींग करण्याआधी चित्रपटातील संपूर्ण कास्टला 14 दिवसांसाठी क्वॉरंटाइन व्हावं लागतं. आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर शुटींग पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर कास्ट लंडनमध्ये पोहोचली आणि तिथेही शुटींग डबल शिफ्टमध्ये पूर्ण केलं. अक्षय कुमार 120 लोकांच्या टीमसोबत 2 ऑक्टोबर रोजी शुटींग पूर्ण करून भारतात परतला. महत्त्वाच्या बातम्या : सुशांत मृत्यूप्रकरण : वैद्यकीय पथकाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह, AIIMS चं निवेदन आजच्या दिवशी प्रदर्शित झाला पहिला बाँडपट; असा आहे 26 चित्रपटांचा प्रवास
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement