एक्स्प्लोर

Selfiee Box Office Collection : अरेरे! अक्षय कुमारचा 'सेल्फी' रिलीजच्या पहिल्याच दिवशी सुपरफ्लॉप; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Selfiee : अक्षय कुमारचा 'सेल्फी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा जादू दाखवण्यात कमी पडला आहे.

Selfiee Box Office Collection Day 1 : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाशमीचा (Emraan Hashmi) 'सेल्फी' (Selfiee) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा जादू दाखवण्यात कमी पडला आहे. 

'सेल्फी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Selfiee Box Office Collection) 

गेल्या वर्षी अक्षयचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे 'सेल्फी' या सिनेमाकडून खिलाडी कुमारच्या खूप अपेक्षा होत्या. पण या सिनेमाचं ओपनिंग डे बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच निराशाजनक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षयच्या 'सेल्फी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 3 कोटींची कमाई केली आहे. 

'सेल्फी' हा सिनेमा 'ड्रायव्हिंग लायसेंस' (Driving Licence) या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. 150 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. बिग बजेट सिनेमा असल्याने निर्मात्यांच्यादेखील या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. आता वीकेंडला हा सिनेमा किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

'सेल्फी' या सिनेमाचं कथानक काय? (Selfiee Movie Story) 

'सेल्फी' या सिनेमात अक्षय कुमार सुपरस्टार विजय कुमारच्या भूमिकेत आहे. तर इमरान हाशमीने त्याच्या चाहत्याची भूमिका साकारली आहे. सेलिब्रिटीसोबत एक सेल्फी मिळवण्यासाठी वेड्या झालेल्या एका चाहत्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. इमरान हाशमी हा आरटीओ ऑफिसर असून तो अडचणीत सापडलेल्या अक्षय कुमारची म्हणजेच विजय कुमारची कशी मदत करतो याचा गंमतीशीर प्रवास सिनेमात दाखवण्यात आला आहे. पण त्यानंतरही विजय चाहत्याला एक 'सेल्फी' देतो का हे प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळेल. या सिनेमात अक्षय आणि इमरानसह नुसरत भरुचा आणि डायना पेंटीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. राज मेहताने या सिनेमात दिग्दर्शन केलं असून करण जौहरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

संबंधित बातम्या

Selfiee Review : सेलिब्रिटींसोबत 'सेल्फी' काढण्याचा अट्टाहास; चाहत्याची गोष्ट मांडणारा चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget