Bollywood Actress : पहिल्याच चित्रपटात अभिनेत्री नायक; साऊथच्या दिग्गज अभिनेत्यासोबत मोडलं लग्न; ओळखलं का?
Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोतील अभिनेत्रीला ओळखणं नेटकऱ्यांना कठीण जात आहे.
Bollywood Actress : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असते. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्रीचा एक बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अभिनेत्रीला (Bollywood Actress) ओळखणं सर्वांसाठी कठीण जात आहे. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलीदेखील आहेत. पण काही कारणाने अभिनेत्रीचं लग्न मोडलं होतं.
कोण आहे 'ही' अभिनेत्री?
दिवंगत अभिनेत्री विमी यांनी मांडीवर घेतलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी असून लोकप्रिय अभिनेत्री सारिका ठाकूर आहे. सारिका ठाकुरचा जन्म 5 डिसेंबर 1960 रोजी दिल्लीत झाला. सारिकाने कमी वयातच बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. सारिका लहान वयात असतानाच तिच्या वडिलांनी कुटुंबाला सोडलं. त्यामुळे कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी सारिकाला चित्रपटांमध्ये काम करावं लागलं. सारिकाने चित्रपटांच्या माध्यमातून संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती.
सारिकाबद्दल जाणून घ्या...
सारिकाने वयाच्या पाचव्या वर्षी बालकलाकार म्हणून काम सुरू केलं. साठच्या दशकात सारिकाने अनेक चित्रपटांत नायकाची भूमिका साकारली. त्यावेळी मास्टर सूरज म्हणून ती ओळखली जायची. पण बालकलाकार म्हणून तिचा 'हमराज' हा चित्रपट चांगलाच गाजला. 1967 मध्ये आलेल्या या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती.
'हमराज'नंतर सारिका अनेक चित्रपटांमध्ये झळकली. यात 'रजिया सुल्तान', 'बडे दिल वाले', 'नास्तिक' आणि 'मैं कातिल हूँ' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. सारिका दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनसोबत लग्नबंधनात अडकली त्यावेळी तिचं करिअर पीकवर होतं. लग्नानंतर सारिकाने सिनेसृष्टीपासून स्वत:ला दूर केलं. पण सारिका आणि कमल हासन यांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 16 वर्षानंतर 2004 मध्ये कमल हासन आणि सारिका विभक्त झाले. कमल हासन आणि सारिका यांना दोन मुली आहेत. श्रुती हासन आणि अक्षरा हासन अशी त्यांच्या दोन मुलींची नावे आहेत. कमल हासन मनोरंजनसृष्टीत सक्रीय आहेत. तर सारिका मात्र लाइमलाइटपासून दूर आहे.
सारिकाने 70-80 च्या दशकात बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. सारिकाच्या यशस्वी चित्रपटांमध्ये श्रीमान श्रीमती, सत्ते पे सत्ता, राज तिलक, तहान, मनोरमा सिक्स फीट अंडर, भेजा फ्राय आणि परजानियासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. परजानिया या चित्रपटासाठी सारिकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
संबंधित बातम्या