Aishwarya Rai Shweta Nanda Bachchan : ऐश्वर्या रायच्या 'या' सवयीची नणंद श्वेता नंदाला येते चीड, म्हणाली, ती कधीच....
Aishwarya Rai Shweta Nanda Bachchan : श्वेता बच्चन-नंदा हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत श्वेता बच्चन ही वहिनी ऐश्वर्याच्या कोणत्या सवयी आवडत नाही, याबाबत सांगताना दिसत आहे.
Aishwarya Rai Shweta Bachchan : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लाडकी लेक श्वेता बच्चन (Shweta Bachchan Nanda) आणि सून ऐश्वर्या बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्या नातेसंबंधात सगळं काही आलबेल नसल्याचे म्हटले जाते. या दोघींमध्ये असणाऱ्या वादामुळे ऐश्वर्या राय बच्चन ही वेगळी राहत असल्याची चर्चा आहे. या सगळ्या चर्चांदरम्यान, श्वेता बच्चन-नंदा हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत श्वेता बच्चन ही वहिनी ऐश्वर्याच्या कोणत्या सवयी आवडत नाही, याबाबत सांगताना दिसत आहे. या व्हिडीओवर लोकांच्या कमेंट्स येत आहे.
View this post on Instagram
श्वेता बच्चनला ऐश्वर्याची कोणती सवय आवडते?
सेलिब्रिटींच्या अनेक खासगी, वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. Reddit वर असलेल्या एका पोस्टवर असून त्यामध्ये श्वेता बच्चन आणि शर्मिला टागोरची एक व्हिडीओ क्लिप आहे. श्वेता कॉफी विथ करण मध्ये बोलताना दिसत आहे. करणने श्वेताला ऐश्वर्याबद्दल प्रश्न विचारले. यावेळी करणने विचारले की, ऐश्वर्याबद्दल तुझे मत काय? तिच्या कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या गोष्टींचा तिटकारा आहे. यावर श्वेताने दिलखुलास उत्तर दिले. ऐश्वर्या ही सेल्फ मेड, स्ट्राँग महिला असून ती एक चांगली आई असल्याचे श्वेताने सांगितले. ऐश्वर्याच्या याच गोष्टी आवडत असल्याचे तिने म्हटले.
ऐश्वर्याच्या कोणत्या गोष्टींची आहे चीड?
View this post on Instagram
ऐश्वर्या रायच्या कोणत्या गोष्टीची चीड येते असे करण जोहरने श्वेताला विचारले. त्यावर तिने सांगितले की, ऐश्वर्या राय ही मेसेज अथवा मिस्ड कॉलला कधीही उत्तर देत नाही. ऐश्वर्याच्या टाईम मॅनेजमेंटला सहन करावे लागते.
ऐश्वर्या आणि श्वेतामध्ये विसंवाद?
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या आणि श्वेता जेव्हाही एखाद्या इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक अंतर दिसून येते. दोघेही एकत्रित फार कमी वेळा दिसतात.
ऐश्वर्या राय ही 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत विवाहबद्ध झाली होती. या दोघांनी 'ढाई अक्षर प्रेम के', 'रावण', 'गुरू', 'धूम-2' आदी चित्रपटात काम केले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आराध्या नावाची मुलगी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या नेहमी एकत्र दिसतात.