एक्स्प्लोर

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्तीच्या हाती बिग बजेट प्रोजेक्ट, महाभारताशी संबंधित चित्रपटात द्रौपदीची भूमिका साकारणार

अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)आता रुमी जाफरीच्या चित्रपटातून कमबॅक करणार आहे. हा चित्रपट महाभारताशी संबंधित असून त्यामध्ये रिया चक्रवर्ती द्रौपदीची भूमिका साकारणार आहे. 

मुंबई : सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती अलिकडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती आता महाभारतीशी संबंधित एका बिग बजेट चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनु कपूर आणि इमरान हाश्मी, क्रिस्टल डिसूजा हे कलाकार काम करणार आहेत. या चित्रपटामध्ये रिया चक्रवर्तीला द्रौपदीची भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. 

सुशांत सिंह प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या रिया चक्रवर्तीला सध्या अनेक चित्रपटांची ऑफर मिळत आहे. 2018 साली 'जलेबी' या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सुशांत सिंह प्रकरणात तिला अनेकवेळा पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे रिया प्रसिद्धीच्या झोतात आली होती. रुमी जाफरी हा महाभारताशी संबंधित एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्यामध्ये त्याने रियाला संधी देण्याचं ठरवलं आहे. 

महाभारताशी संबंधित या चित्रपटातून महाभारत आणि द्रौपदीशी संबंधित विविध आयाम दाखवण्यात येणार आहेत. रुमी जाफरीने सांगितलं की हा चित्रपट आजच्या जगाशी मिळता-जुळता बनवला जाईल. त्यामध्ये मॉडर्न कन्टेंट वापरण्यात येणार आहे. 

तेलुगु चित्रपटातून करियरची सुरुवात
रिया चक्रवर्तीने आपल्या करियरची सुरुवात 2012 साली एका तेलुगु चित्रपटाच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर तिने बँक चोर या हिंदी चित्रपटात काम केलं. त्यानंतर तिने हाफ गर्लफेण्ड, मेरे डॅड की मारुती आणि जलेबी या चित्रपटांत काम केलं. सुशांत सिंह प्रकरणातून बाहेर आल्यानंतर अलिकडे रिया ही तिच्या इन्स्टाग्रामवर मोटिव्हेशनल कोट शेअर करते. 

याआधी दिग्दर्शक आणि लेखक रुमी जाफरी यानं रिया बाबतीत बोलताना सांगितलं होतं की, प्रत्येकाला हे वर्ष वाईट गेलंय, रियालाही या वर्षात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलंय. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला एक महिना तुरुंगात काढावा लागला. या गोष्टीचा तिच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे.

रुमी जाफरी पुढे म्हणाला होता की, "रिया बॉलिवूडमध्ये कमबॅक करेल. ती ज्या परिस्थीतीतून गेलीय त्यानंतर तिच्यावर आपण आरोप करु शकत नाही." रिया चक्रवर्तीची तुरुंगातून सुटका झाली होती तेव्हा रुमी जाफरीने तिची भेट घेतली होती आणि तिला बॉलिवूडमध्ये पुन्हा परतायला सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित

व्हिडीओ

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report
ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report
Political Family Result : घराणेशाहीचा कुठे जय, कुठे पराजय? Special Report
Pashchim Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Embed widget