एक्स्प्लोर
अभिनेत्री ईशा कोप्पीकर आज भाजपत प्रवेश करणार
बॉलिवूडमधली मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकर आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशाचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
मुंबई : बॉलिवूडमधली मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकर आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. आज षण्मुखानंद सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशाचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
षण्मुखानंद सभागृहात आज भाजपने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी पक्षाच्या देशव्यापी वाहतूक संघटनेची घोषणा केली जाणार आहे. या मंचावर ईशा कोप्पीकर हिचा भाजपात अधिकृत प्रवेश होणार असून तिच्याकडे वाहतूक संघटनेतील देशपातळीवरची मोठी जबाबदारीदेखील सोपवली जाणार आहे.
या कार्यक्रमाला नितीन गडकरी, हाजी अरफात शेख यांच्यासह भाजपचे राज्यातील अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर बॉलिवूडमधील कलाकारांना पक्षात घेऊन प्रचारात स्टार कॅम्पेनेर म्हणून वापरण्यावर भाजपचा भर असणार आहे.
ईशाने आतापर्यंत अनेक हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड भाषि चित्रपटांमध्ये काम केले आहे.ईशाने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या एफयू : फ्रेंडशीप अनलिमिटेड या मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच 'रब ने बना दी जोडी', 'एक विवाह ऐसा भी', 'राईट या राँग','मैंने प्यार क्यों किया', 'डरना जरुरी है', 'क्या कूल है हम', 'हम तुम' अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'मात' या चित्रपटाद्वारे ईशाने मराठी चित्रपटसृष्टीत डेब्यू केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement