Deepika Padukone ने शेअर केलं आपलं डेली रूटीन; म्हणाली...
बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांची जीवनशैली याबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. तसेच त्यासंदर्भात माहिती करुन घेण्यासाठी अनेकजण उत्सुकही असतात. अशातच लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या दीपिका पादुकोनने आपलं डेली रूटीन चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि तिचं फिटनेस रुटिन यासंदर्भात नेहमीच तिच्या फॅन्स आणि फॉलोअर्समध्ये चर्चा रंगलेल्या असतात. दीपिका नेहमीच आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरुन आपल्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहते आपल्या फेवरेट स्टारच्या डेली रुटिनबाबत माहीत करुन घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. अशातच अभिनेत्री दीपिका पादुकोनने आपल्या चाहत्यांसाठी एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका आपल्या दिनक्रमाबाबत सांगताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चाहते या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
व्हिडीओ शेअर करण्यासोबत दीपिका पादुकोनने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'My Daily Routine Watch till the end.' दीपिका व्हिडीओमध्ये मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्याचसोबत ती आपल्या फॅन्सला हे सांगत आहे की, माझ्यासाठी हे सांगणं खरंच खूप अवघड आहे. कारण प्रत्येक दिवस हा एकसारखा नसतो. मी सकाळी उठल्यापासून ब्रश करते आणि त्यानंतर ब्रेकफास्ट. मला माझी सकाळ थोडीशी शांतच आवडते आणि त्यानंतर मी वर्कआऊट करते.
View this post on Instagram
व्हिडीओ तयार करत असणाऱ्या व्यक्तीने दीपिकाला प्रश्न विचारला की, तुम्ही तुमचं डेली रुटिन प्लान करता का? ज्यानंतर उत्तर देताना दीपिका म्हणाली की, मी करतेही आणि करतही नाही. असं मला वाटतं की, मी जर एखादं काम करत असेल आणि ते जर एखादा प्लान करुन केलं तर जास्त योग्य असेल. अशातच मला काही गोष्टी जशा घडतात, तशा घडून देणं अधिक आवडतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :