एक्स्प्लोर
Advertisement
सेना-भाजप शीतयुद्धाचा अक्षयकुमारच्या शॉर्टफिल्मला फटका?
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारच्या सामाजिक कार्याबद्दल अनेकांना माहिती आहेच. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना त्याने केलेली कोट्यवधी रुपयांची मदत ते सामाजिक विषय हाताळणाऱ्या चित्रपटांची निर्मिती किंवा अभिनय या सर्वात अक्षय अग्रेसर आहे. मात्र तरुणाईमध्ये
आजारांविषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी तयार केलेली एक सरकारी शॉर्टफिल्म लालफितीच्या कारभारात अडकली आहे.
'फर्स्टपोस्ट'च्या वृत्तानुसार अक्षयने हायपर टेंशन, हाय बीपी याविषयी जनजागृती करणारी एक शॉर्टफिल्म केली. विशेष म्हणजे यासाठी त्याने एक रुपयाचंही मानधन घेतलेलं नाही. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने 7 एप्रिलला महापालिकेची स्कीम लाँच होणार होती, सोबत या शॉर्टफिल्मचंही स्क्रीनिंग होणार होतं. मात्र तूर्तास हे लाँचिंग मे महिन्यापर्यंत लांबणीवर पडलं आहे.
मुंबईकर तरुणांमध्ये हायपरटेंशन आणि हाय बीपीच्या लक्षणांमध्ये वाढ झाल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागाला आढळलं होतं. बदलती लाईफस्टाईल आणि जंक फूडमुळे 25 ते 40 वयोगटातील 30 टक्के तरुणांना हा त्रास असल्याची माहिती आहे. याबाबतच अक्षयकुमारने शॉर्टफिल्मच्या
माध्यमातून जनजागृती केली आहे.
चार मिनिटांच्या या शॉर्ट फिल्मसाठी अक्षयकुमार प्रमाणेच दिग्दर्शक राजू हिरानी यांनीही एकही पैसा घेतलेला नाही. मे महिन्यात ही शॉर्टफिल्म सर्व वाहिन्या आणि चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येईल. 4 एप्रिलला ताज लँड्स एण्डमध्ये हा सोहळा होणार होता, मात्र तो महिन्याभरासाठी पुढे ढकलण्यात आला. अक्षय त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तीन आठवडे परदेशी रवाना होत आहे.
'जान बचाओ' या आरोग्यविषयक जागृती अभियानाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे वेळ नसल्याचं म्हटलं जातं. दोघंही 4 एप्रिलच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, मात्र नंतर काही कारणाने दोघांनीही वेळ नसल्याचं सांगितलं, असं फर्स्टपोस्टने म्हटलं
आहे.
रविवारी उद्धव ठाकरे यांनी एकला चलो रे चा नारा दिल्यामुळे हे शीतयुद्ध पेटल्याचं बोललं जातं. त्यामुळे सेना-भाजपमधील वाढत्या दरीचा फटका या अभियानाला बसल्याचं चित्र आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement