एक्स्प्लोर
Advertisement
Bipasha Basu: "ही तर डॉल..." ; बिपाशा बासूनं शेअर केलेल्या लेकीच्या क्युट व्हिडीओनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष!
Bipasha Basu: बिपाशानं नुकताच तिच्या लेकीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Bipasha Basu: अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंह ग्रोव्हर (Karan Singh Grover) हे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आई-बाबा झाले. बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या मुलीचे नाव देवी असं ठेवलं आहे. बिपाशा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लेकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. बिपाशानं नुकताच तिच्या लेकीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
बिपाशानं नुकताच देवीचा एक क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती देवीला कडेवर घेऊन उभी राहिलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये बिपाशा ही पिवळ्या रंगाचा आऊटफिट आणि गोल्डन इअरिंग्स अशा लूकमध्ये दिसत आहे तर देवी ही पिंक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. बिपाशानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये "दिल है छोटा सा छोटी सी आशा" या गाण्याचं म्युझिक ऐकू येत आहे. व्हिडीओमधील देवीच्या क्युटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
बिपाशानं शेअर केलेल्या देवीच्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "ही तर डॉलसारखी दिसत आहे.खूपच क्युट" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "ती लवकरच चालायला सुरुवात करेल"
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
बिपाशा आणि करण सिंह ग्रोव्हरनं 2016 मध्ये लग्न केलं. बिपाशा ही करण, देवी आणि तिच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. धूम 2, फिर हेरा फेरी,नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये बिपाशानं काम केलं आहे. आता बिपाशाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
देवीच्या जन्मानंतर बिपाशाच्या वाढलेल्या वजनामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. या ट्रोलर्सला बिपाशानं सडेतोड उत्तर दिलं.ती मुलाखतीमध्ये म्हणाली होती, “मी ट्रोलर्सला सांगू इच्छिते की, कृपया तुम्ही ट्रोल करत रहा. मला काही फरक पडत नाही. कारण मला याचा त्रास होत नाही."
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement