Dia Mirza on Nawazuddin Siddiqui: 'इतरांशी बोलण्याची शिस्त नाही'; नवाजुद्दीन सिद्दिकीवर दिया मिर्झा बरसली, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन झापलं; कारण काय?
Dia Mirza on Nawazuddin Siddiqui: दिया मिर्झाने नवाजुद्दीन सिद्दिकीबद्दल केलेली पोस्ट सोशल मीडियात चर्चेत.

Dia Mirza on Nawazuddin Siddiqui Post: दिवाळी व्हिडीओमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री दिया मिर्झा (Diya Mirza) पुन्हा एकदा आपल्या पोस्टमुळे चर्चेत आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचा उल्लेख केला आहे. या पोस्टमधून तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे. तिने पोस्टमध्ये, 'नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत (Nawazuddin Siddiqui) काम करणे म्हणजे एखाद्या दु:स्वप्नापेक्षा कमी नाही. इतरांशी कसे बोलावे, याचे त्याला अजिबात शिस्त नाही', असं दिया मिर्झा आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. दियाने शेअर केलेल्या या पोस्टनंतर, अनेक लोकांना असं वाटतं की, इंडस्ट्रीमध्ये एक नवीन वाद निर्माण झाला आहे. तर, काहींच्या मते हे एका नव्या प्रोजेक्टचे प्रमोशन आहे.
नवाजुद्दीन सिद्दिकीबाबत दिया मिर्झा असं का म्हणाली? पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Dia Mirzas Cryptic Post About Nawazuddin Siddiqui Goes Viral)
दिया मिर्झाने दिवाळीपूर्वी एक जनजागृतीपर व्हिडीओ शेअर केला होता. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर BMCने व्हिडीओ हटवला होता. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, या प्रकरणानंतर दिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने पोस्ट शेअर करुन नवाजुद्दीन सिद्दिकीवर निशाणा साधला आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'त्याच्यासोबत काम करणे म्हणजे एक दु:स्वप्न आहे. त्याच्याकडे इतरांशी बोलण्याची शिस्त नाही आहे. त्याचा अंहकार वेगळ्याच पातळीवर आहे'.
'तो अगदी उद्धट कॅरेक्टर आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी', असं दिया मिर्झाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दिया मिर्झाची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी दिया मिर्झाच्या पोस्टवर अनेक तर्क वितर्क लावले आहेत. दिया मिर्झाने ज्या प्रकारे पोस्ट शेअर केली आहे, त्यामुळे काहींना असे वाटू लागले आहे की, आगामी प्रोजेक्टसाठी ही पोस्ट शेअर केली आहे. हा एक प्रसिद्धीचा डाव आहे, असं काहींचं म्हणणं आहे.
तर, काही जण विचारत आहेत की, दोघांमध्ये एखादा नवीन वाद निर्माण झाला आहे का? एका युझरने कमेंटमध्ये म्हटलं की, 'इथे कॅरेक्टर हा किवर्ड आहे. दोघेही लवकरच आपल्या नवीन प्रोजेक्टबद्दल सांगतील'. 'अरे देवा, दोघांमध्ये कोणता नवीन वाद निर्माण झाला?', असा प्रश्न एका युझरने उपस्थित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच जिओ हॉटस्टारवर नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची आगामी सिरीज रिलीज होणार आहे. ही सिरीज मेडिकल ड्रामावर आधारीत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















