एक्स्प्लोर

Binodiini : ‘नटी बिनोदिनी'मधून उलगडणार बंगालच्या थिएटर लिजेंड 'बिनोदिनी दासी' यांचे कथनात्मक चरित्र!

Binodiini : बंगालच्या थिएटर लिजेंड 'बिनोदिनी दासी' यांचे कथनात्मक चरित्र 'नटी बिनोदिनी' (Binodiini) या आगामी बंगाली चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Binodiini : बंगालच्या थिएटर लिजेंड 'बिनोदिनी दासी' यांचे कथनात्मक चरित्र 'नटी बिनोदिनी' (Binodiini) या आगामी बंगाली चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, 'देव एन्टरटेनमेन्ट व्हेंचर’ तर्फे या चित्रपटाची प्रस्तुती केली जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेंद्र कुमार, सूरज शर्मा आणि प्रतीक चक्रवर्ती करणार आहेत. शिक्षक दिनाच्या शुभ मुहूर्तावर, दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांनी त्यांच्या बहुचर्चित बायोपिक 'बिनोदिनी’मधील मुख्य कलाकारांची घोषणा केली.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा ही बहुचर्चित भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या टीझर पोस्टरचे नुकतेच अनावरण केले. त्या पोस्टरवर रुक्मिणी मैत्रा या ‘श्री चैतन्य महाप्रभू’ यांच्या भूमिकेत दिसत आहेत. बिनोदिनी दासी यांनी ‘श्री चैतन्य महाप्रभू’ यांची व्यक्तिरेखा रंगभूमीवर साकारली होती. रुक्मिणी मैत्रा या त्यांच्या श्री चैतन्य अवतारात ओळखूनच येत नाहीत. ज्या सूक्ष्म तपशिलांसह ही व्यक्तिरेखा साकारलेली दिसते, ती सर्वांनाच प्रभावित करणारी आहे. मोशन पोस्टर हे एकता भट्टाचार्य यांनी डिझाईन केले असून, त्याला नीलायन चॅटर्जी यांनी संगीत दिले आहे.

पाहा पोस्टर :

Binodiini : ‘नटी बिनोदिनी'मधून उलगडणार बंगालच्या थिएटर लिजेंड 'बिनोदिनी दासी' यांचे कथनात्मक चरित्र!

प्रमोद फिल्म्स ,एस एस वन एन्टरटेनमेन्ट आणि पी के एन्टरटेनमेन्ट या मुंबई स्थित निर्मिती संस्थांची निर्मिती असलेल्या आणि एसोर्टेड मोशन पिक्चर्सचे सहकार्य असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद प्रियांका पोद्दार यांनी लिहिले आहेत. ‘मला कायमच बंगाली प्रेक्षकांसाठी बिनोदिनी दासी यांची प्रभावित करणारी कथा सांगायची होती. अशा सांगीतिक चित्रपटाकरिता मला अपेक्षित असलेले बजेट मिळवण्याकरिता मला जवळजवळ दोन वर्षे संघर्ष करावा लागला. या सर्व प्रवासात माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी एकमेव व्यक्ती म्हणजे रुक्मिणी मैत्रा.

दोन वर्षांपासून या चित्रपटावर काम सुरु!

'सिझन्स ग्रिटींग्स' आणि 'एक दुआ'मधील माझे काम त्यांनी पाहिलेले होते आणि त्यामुळेच बंगाली रंगभूमीवरील मेगास्टारच्या वेदना आणि तो प्रवास मी हाताळू शकेन, असा मैत्रा यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला. रुक्मिणी माझी ‘बिनोदिनी’ होईल याचा मला आनंद आहे, असे प्रख्यात बॉलिवूड चित्रपट निर्माते राम कमल मुखर्जी म्हणतात.

रुक्मिणी गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहेत. या भूमिकेकरिता त्यांनी शास्त्रीय नृत्याच्या सरावापासून ते अगदी त्या काळातील स्त्रियांच्या सामाजिक स्थितीविषयी भाष्य करणाऱ्या अनेक पुस्तकांचे वाचन देखील त्यांनी केले. ‘ज्यावेळी राम कमल यांनी सांगितले की, त्यांना बिनोदिनी निर्माण करायची आहे, तेव्हापासून मला माहित होते की, त्यांचा या विषयावरचा वेगळा दृष्टिकोन असेल. त्यांना एकही प्रश्न न विचारता मी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला. हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी घडला असता, परंतु कोरोना महामारीने संपूर्ण परिस्थिती बदलली. आपल्या मनोरंजन उद्योगावर खूप परिणाम झाला. असे नामांकित बॅनर्स, निर्माते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देव हे प्रस्तुतकर्ते म्हणून आमच्यासोबत आल्याने हा चित्रपट नक्कीच भव्य निर्मिती करणारा ठरणार आहे’, असे रुक्मिणी मैत्रा सांगतात.

निर्मात्यांना अजून उर्वरित कलाकार आणि तंत्रज्ञ यांची अंतिम निवड करायची आहे. मात्र, यातील प्रमुख कलाकार म्हणून गिरीश घोष, अमृतलाल, ज्योतिंद्रीनरथ, रामकृष्ण, कुमार बहादूर आणि रंगा बाबू हे कलाकार आहेत.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 5 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Embed widget