एक्स्प्लोर

Niti Taylor On Violent Boyfriend: 'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा

Niti Taylor On Violent Boyfriend: 'अलायन्स' शोमध्ये मिनी माथूर, रुही दोसानी आणि देल्बार आर्या यांच्याशी बोलताना निती टेलर हिनं तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडून झालेल्या छळाच्या आठवणींबाबत सांगितलं.

Niti Taylor On Violent Boyfriend: टीव्ही अभिनेत्री (TV Actress) निती टेलर (Niti Taylor) हिनं नुकतंच आपल्या एका टॉक्सिक रिलेशनशिपबाबत खुलासा केलाय. एका हिसंक आणि छळवणूक करणाऱ्या नात्यातून बाहेर पडणाबाबत मोकळेपणानं भाष्य केलंय. 'प्राइम व्हिडीओ'वरील (Prime Video) 'अलायन्स' (Alliance) या रिअ‍ॅलिटी शोमधील चर्चेदरम्यान, तिनं खुलासा केलाय की, तिचा एक्स बॉयफ्रेंड हिंसक प्रवृत्तीचा होता. यावेळी तिनं एका घटनेचा उल्लेख केला, ज्यामध्ये त्यानं सिगारेटनं तिच्या मांडीला चटका दिलेला. या घटनेनंतर तिनं अखेर ते नातं संपवून त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

'अलायन्स' (Alliance Show) शोमध्ये मिनी माथूर, रुही दोसानी आणि देल्बार आर्या यांच्याशी बोलताना निती टेलर हिनं तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडून झालेल्या छळाच्या आठवणींबाबत सांगितलं. भर कार्यक्रमात आपल्या त्वचेवरील जखमेची खूण दाखवत निती म्हणाली की, "माझ्या एक्स बॉयफ्रेंडनं एकदा मला सिगारेटनं चटका दिलेला. तो हिंसक आणि विक्षिप्त स्वभावाचा होता. एका रात्री, त्याचा वाढदिवस होता, त्यावेळी त्याचा ताबा सुटला. तो दिवस अत्यंत भयानक होता. त्यानं मला थोबाडीत मारली आणि मी फक्त इतकंच म्हटलेलं की, "गुडबाय, नंतर भेटुयात... त्यावेळी मी खूपच लहान होते. जेव्हा तुम्ही एखाद्या नाजूक किंवा असुरक्षित परिस्थितीत असता, तेव्हा लोकांचं चारित्र्य नीटपणे ओळखता येत नाही. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता..."

पतीपासून वेगळी झालीय निती टेलर? (Is Niti Taylor Get Divorced)

निती टेलरनं 2020 मध्ये तिचा प्रियकर परीक्षित बावा याच्याशी लग्न केलं. पण, 2024 मध्ये ते दोघेही वेगळे झाल्याच्या बातम्या समोर आल्या. या जोडप्यानं गेल्या दोन वर्षांत एकमेकांसोबतचे फोटो शेअर केलेले नाहीत, तरीही त्यांनी त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांवर स्पष्टपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Niti Taylor On Violent Boyfriend: 'बॉयफ्रेंडनं मांडीवर सिगरेटचे चटके दिले...'; रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा खुलासा

दरम्यान, निती टेलर ही एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आहे, जी 'कैसी ये यारियां'मधील नंदिनी मूर्ती, 'गुलाम'मधील शिवानी माथूर आणि 'इश्कबाज'मधील मन्नत कौर खुराना या भूमिकांसाठी ओळखली जाते. नितीनं वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी इंडस्ट्रीत पाऊल ठेवत, आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 2009 मधील 'प्यार का बंधन' या टेलिव्हिजन सीरिअलद्वारे तिनं पदार्पण केलं. 'कैसी ये यारियां' या सीरिअलनं तिला मोठी ओळख मिळवून दिली. या मालिकेत पार्थ समथानसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि ही जोडी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक बनली. या सीरिअलनं तिला घराघरांत लोकप्रिय केलं. त्यानंतर, नितीनं अनेक टेलिव्हिजन सीरिअल्समध्ये काम केलं आणि 'झलक दिखला जा 10' सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभागी झाली. ती शेवटची 2023 मधील 'बडे अच्छे लगते हैं 2' या सीरिअलमध्ये दिसलेली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aamir Khan Gauri Spratt Marriage: आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, आधीच्या दोन घटस्फोटीत बायकांची अनुपस्थिती, पण मुलांसह जावयाची हजेरी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Ramayan Trailer Date Out: 'रामायण'च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली! निर्मात्यांनी तारखेसह ब्रम्हमुहूर्त काढला, कधी येणार ट्रेलर?
'रामायण'च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली! निर्मात्यांनी तारखेसह ब्रम्हमुहूर्त काढला, कधी येणार ट्रेलर?
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
Kishori Pednekar On Kangana Ranaut: घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
Rahul Gandhi: राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
Embed widget