Bigg Boss OTT 3 Ranveer Shauri : '''आज काम असतं तर इथं नसतो...''; बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी रणवीरच्या मनातील सल बाहेर
Bigg Boss OTT 3 Ranveer Shauri : 'बिग बॉस ओटीटी 3' ला सुरुवात झाली असून 'बिग बॉस'च्या घरात पहिल्याच दिवशी अभिनेता रणवीर शौरी याच्या मनातील खदखद बाहेर आली.
Bigg Boss OTT 3 Ranveer Shauri : 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT 3) ची सुरुवात झाली आहे. खास ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणाऱ्या या रिएल्टी शोमध्ये बिग बॉसच्या घरात 16 स्पर्धक दाखल झाले आहेत. या स्पर्धकांमध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीचाही समावेश आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी अभिनेता रणवीर शौरी याच्या मनातील खदखद बाहेर आली. बॉलिवूडच्या अनेक चांगल्या चित्रपटात आपली छाप सोडणाऱ्या रणवीरने बिग बॉसच्या घरात केलेल्या वक्तव्याची आता चर्चा होत आहे...
रणवीर शौरीला मिळत नाही काम...
बिग बॉसच्या घरात रणवीर शौरीला ओळखू न शकणारे काही स्पर्धक आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शिवानी कुमारीही त्यात आहे. आधी घरात रणवीरसोबत शिवानीचा वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. दोघांमध्ये चांगला संवाद झाला. या दरम्यान शिवानीने रणवीरच्या कामाबद्दल चर्चा करत तुम्ही काय काम करता असे विचारले. त्यावर रणवीरने म्हटले की, मी अभिनेता असून चित्रपटात काम करतो.
Ranvir Shorey says 'main actor hu, aaj kaam hota toh yaha nahi hota' #BiggBossOTT3pic.twitter.com/jhWdi7EDix
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) June 22, 2024
त्यानंतर रणवीर शौरीला शिवानीने विचारले की, तुमचं काम कसं सुरू आहे. त्यावर रणवीरने म्हटले की, आज माझ्याकडे काम असते तर मी इथं कशाला असतो. आता माझ्याजवळ काहीच काम नाही. रणवीर शिवानीचे कौतुक करताना म्हटले की, तुझं चांगलं आहे, तू स्वत: निर्मिती करते आणि स्वत: कमावतेस. आज नवीन तंत्रज्ञान आले आहे आणि आम्ही जुने काळातील आहोत असे रणवीरने म्हटले.