Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात मुलाची आठवण आल्यानंतर मुनव्वर फारुकी झाला भावूक; पाहा व्हिडीओ
Bigg Boss 17: नुकताच बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मुनव्वर हा त्याच्या पाच वर्षाच्या मुलाबद्दल बोलताना दिसत आहे.
Bigg Boss 17: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बिग बॉस 17 (Bigg Boss 17) हा शो सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं (Munawar Faruqui) देखील बिग बॉस 17 या शोमध्ये सहभाग घेतला आहे. मुनव्वरनं याआधी कंगना रानौतच्या 'लॉक अप' शोमध्ये दिसला होता आणि शोचा विजेताही होता. लॉक अप शोदरम्यान मुनव्वरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जास्त माहिती दिली नव्हती, परंतु बिग बॉस-17 या कार्यक्रमामध्ये मुनव्वर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे. नुकताच बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मुनव्वर हा त्याच्या पाच वर्षाच्या मुलाबद्दल बोलताना दिसत आहे.
बिग बॉसच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मुनव्वर फारुकी हा नील भट्टशी बोलताना इमोशनल झाला आहे. मुनव्वरने शो दरम्यान खुलासा केला की त्याच्या एक्स वाइफचे नुकतेच लग्न झाले आहे.
मुनव्वर नील भट्टला सांगतात, “माझी एक्स वाइफ आता विवाहित आहे आणि माझ्या मुलाची कस्टडी माझ्याकडे आहे. माझा मुलगा पाच वर्षाचा आहे. तो सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडे आला आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यात मी त्याच्याशी खूप जोडलो गेलो आहे. मला त्याची आठवण येते. तो यावेळी काय करत असेल? याचा मी सतत विचार करत असतो. '
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
मुनव्वर फारुकीने कंगना राणौतच्या शो 'लॉक अप सीझन 1' मध्ये पहिल्यांदाच त्याच्या सिक्रेट वेडिंगबद्दल आणि मुलाबद्दल खुलासा केला होता. बिग बॉस 17 मध्ये सध्या मुनव्वर त्याच्या कविता आणि विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या शोमध्ये मुनव्वरची मनारा चोप्रासोबतची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. ऐश्वर्या शर्मा , नील भट्ट, अंकिता लोखंडे, विकी जैन , मनारा चोप्रा,नावेद सोल,अनुराग डोभाल,जिग्ना वोरा,सोनिया बन्सल यांनी देखील बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे.बिग बॉसच्या घरात भांडण, वाद आणि स्पर्धकांमधील बाचाबाची या सर्व गोष्टी होत आहेत. बिग बॉस-17 कार्यक्रमाच्या 'विकेंड का वार' या स्पेशल एपिसोडमध्ये सलमान खान हा स्पर्धकांची शाळा घेतो.
इतर महत्वाच्या बातम्या: