Ankita Lokhande : 'बिग बॉस'ची ट्रॉफी हुकली, पण मिळाला मोठा सिनेमा; 'या' अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार अंकिता लोखंडे!
Ankita Lokhande New Film : 'बिग बॉस 17'च्या (Bigg Boss 17) ट्रॉफीवर अंकिता लोखंडेचं नाव कोरलं गेलं नसलं तरी अभिनेत्रीला आता एक सिनेमा मिळाला आहे.
Ankita Lokhande New Project : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक सध्या चर्चेत आहेत. 'बिग बॉस 17'च्या (Bigg Boss 17) ट्रॉफीवर अंकिता लोखंडेचं नाव कोरलं गेलं नसलं तरी अभिनेत्रीला आता एक सिनेमा मिळाला आहे.
'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर अंकिताचं नाव कोरलं न गेल्याने ती नाराज होती. पण या कार्यक्रमाची विजेती न होतादेखील अंकिताला एका मोठ्या प्रोजेक्टसाठी विचारणा झाली आहे. 'बिग बॉस 17'मध्ये सहभागी होण्याआधी अंकिता लोखंडे कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टची भाग नव्हती. पण 'बिग बॉस 17'मधून बाहेर पडताच अंकिताला एक मोठा सिनेमा मिळाला आहे.
अंकिता लोखंडे 'या' सिनेमात झळकणार
'बिग बॉस 17' हा कार्यक्रम हरल्याचा परिणाम अंकिता लोखंडेच्या करिअरवर झालेला नाही. या कार्यक्रमातून बाहेर पडताच तिला एका पेक्षा एक सिनेमांसाठी विचारणा होत आहे. अभिनेत्रीने स्वत: याचा खुलासा केला आहे.
View this post on Instagram
अंकिताने सोशल मीडियावर 'वीर सावरकर' या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत तिने या सिनेमाचा भाग असल्याचा खुलासा केला आहे. 'बिग बॉस 17' संपताच 'वीर सावरकर'च्या निर्मात्यांनी अंकिताला विचारणा केली. अभिनेत्रीने लगेचच या सिनेमासाठी होकार दिला. अंकिता लोखंडे या सिनेमात रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रणदीप हुड्डाचा हा सिनेमा 22 मार्च 2024 रोजी रिलीज होणार आहे. आता अभिनेत्री या सिनेमात कोणत्या भूमिकेत झळकणार हे समोर आलेलं नाही. आता 'वीर सावरकर'च्या माध्यमातून रुपेरी पडदा गाजवायला अंकिता लोखंडे सज्ज आहे.
अंकिता लोखंडेने 'या' सिनेमाच्या माध्यमातून केलेलं मनोरंजनसृष्टीत पदार्पण
अंकिता लोखंडेने 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. मालिकेनंतर अंकिता सिनेसृष्टीकडे वळाली. कंगना रनौतच्या 'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. या सिनेमासह ती 'बागी 3'मध्येही झळकली आहे.
संबंधित बातम्या