Abdu Rozik Wedding : 'या' एका कारणाने अब्दु रोझिकने लग्न पुढं ढकललं, म्हणाला, असा क्षण...
Abdu Rozik Wedding : मागील महिन्यात अब्दुचा साखरपुडाही पार पडला होता. अब्दुने आपल्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला होता. पुढील महिन्यात होणारा विवाह सोहळा आता अब्दुने पोस्टपोन केला आहे.
Abdu Rozik Wedding : बिग बॉस 16 मध्ये झळकलेला ताजकिस्तानचा प्रसिद्ध गायक अब्दु रोझिकने (Abdu Rozik) आपल्या लग्नाची घोषणा केली होती. मागील महिन्यात अब्दुचा साखरपुडाही पार पडला होता. अब्दुने आपल्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला होता. पुढील महिन्यात, जुलैमध्ये अब्दुने आपले लग्न होणार असल्याचे जाहीर केले होते. आता, 7 जुलै रोजी होणारे लग्न पोस्टपोन केले आहे. विवाह सोहळा पोस्टपोन करण्यामागे एक खास कारणदेखील आहे.
अब्दुने का पोस्टपोन केले लग्न?
'ई टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, अब्दु रोझिकची पहिली टायटल बॉक्सिंग फाइट आहे. ही फाइट 6 जुलै रोजी होणार आहे. यामुळेच अब्दुने आपले लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. अब्दुने सांगितले की, मी कधीच विचार केला नव्हता की अशी संधी मला कधी मिळेल. या वर्षी इतक्या काही गोष्टी घडल्यानंतर आता मला लग्न पोस्टपोन करावे लागले आहे. मला यामुळे भविष्यातील आर्थिक सुरक्षिता मिळले.
होणाऱ्या पत्नीने दिला पाठिंबा
View this post on Instagram
अब्दुने पुढे सांगितले की, माझी होणारी पत्नी अमिरानेदेखील मला या निर्णयासाठी पाठिंबा दिला आहे. माझ्या या निर्णयामुळे दोघांच्या आयुष्यात मोठा बदल होईल असे वाटते. ही टायटल फाईट माझ्या उंचीच्या लोकांसाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. ही फाईट जिंकण्यासाठी माझी ट्रेनिंग सुरू असल्याचे त्याने सांगितले.
सध्या तरी लग्नाची कोणतीही नवीन तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, बॉक्सिंग फाईटनंतर लग्नाचे सेलिब्रेशन होणार असल्याचे त्याने सांगितले. सध्या अब्दुने आपले सारे लक्ष प्रशिक्षणावर केंद्रीत केले आहे. या फाईटनंतर माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळेल असे अब्दुने सांगितले.
अब्दुने मे महिन्यात शारजाहच्या अमीरा नावाच्या मुलीसोबत साखरपुडा केला होता. अब्दु रोझिकने अमीरासोबत केलेला साखरपुडा हा एक पीआर स्टंट असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले. मात्र, हे सगळे दावे, आरोप अब्दुने फेटाळून लावले होते. मी माझ्या कोणत्याही म्युझिक व्हिडीयोचा पीआर नाही करत. माझ्यासारख्या लहान उंचीच्या व्यक्तीला प्रेम मिळालं आहे, हे काहींना बघवत नाही असेही अब्दुने म्हटले होते.
ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक अब्दु रोझिकने गायलेली 'ओही दिली जोर', 'चकी चकी बोरॉन' आणि 'मोदर'ही गाणी प्रसिद्ध आहेत. मात्र, 'बिग बॉस 16'मध्ये आल्यानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात त्याचे फॅन फॉलोईंग खूप वाढले. यानंतर, तो सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात झळकला होता. त्याशिवाय, 2023 मध्ये तो 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 13' मध्येही सहभागी झाला.