एक्स्प्लोर

Bhuj: The Pride Of India Trailer : ‘मैं जीता हूं मरने के लिए, मेरा नाम है सिपाही'; 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'चा दमदार ट्रेलर रिलीज

Bhuj: The Pride Of India Trailer : अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Bhuj: The Pride Of India Trailer : बॉलीवुड स्टार अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हा यांचा आगामी चित्रपट 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याअगोदर डिस्ने + हॉटस्टारने नुकताच भुज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये थरारक घटनांचे सीक्वेन्स, भावनांच्या अनेक छटा, देशप्रेम आणि भुजमधील लोकांची एकता प्रतीत होत आहे. ट्रेलर सुरु झाल्यापासून संपेपर्यंत ट्रेलर पाहताना एकदाही कंटाळा आल्यासारखं वाटत नाही. ट्रेलरमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या ट्रेलरमधील डायलॉग्स. प्रेक्षकांना खिळवूण ठेवण्यात सर्वात मोठी भूमिका हे डायलॉग्स बजावत आहेत. अशातच अजय देवगणला सैनिकाच्या भूमिकेत पाहूनही चाहते खूश झाले आहेत. तसेच संजय दत्त यांचीही भूमिका लक्ष वेधून घेते. 

या चित्रपटात अनेक तरुणांची क्रश असलेली नोरा फतेही देखील दिसून येणार आहे. नोरा या चित्रपटात आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. जरी ट्रेलरमध्ये सोनाक्षी सिन्हाला फार कमी स्क्रिन स्पेस दिसत असली, तरी तिची भूमिका परिणामकारक असल्याचं दिसून येत आहे. 

पाहा चित्रपटाचा ट्रेलर : 

13 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज होणार चित्रपट 

यावर्षीचा बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक असलेला ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ 13 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज होणार आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याअगोदर डिस्ने + हॉटस्टारने नुकताच भुज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे, ज्यात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत आहेत. भारतीय वायुसेनेचे आयएएफ स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक यांच्या पराक्रमावर प्रेरीत भुज चित्रपट आहे.

सत्य घटनेवर आधारीत

हा चित्रपट 1971 च्या सत्य घटनेवर आधारित आहे. जेव्हा पाकिस्तानने भारताच्या एअरबेसवर हल्ला केला होता. एअरबेसवर 92 बॉम्ब आणि 22 रॉकेटने हल्ला करण्यात आला होता. अशा परिस्थिती भारतीय हवाई दलाच्या शूर अधिकाऱ्याने आपल्या धैर्याने एअरबेस वाचवलाच. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नवीन हवाई पट्टी रात्रीत तयार केली. विजय कर्णिक असे अधिकाऱ्याचे नाव होते. अजय देवगण चित्रपटात तीच भूमिका साकारत आहेत.

सोनाक्षी गावची मुलगी तर नोरा दिसणार एजंटच्या भूमिकेत

या चित्रपटात प्रत्येक पात्राची भूमिका खूप रंजक आहे. विशेषत: सोनाक्षी सिन्हा आणि नोरा फतेही. नोरा या चित्रपटातून अभिनयाची कौशल्ये दाखवणार आहे, यात ती एजंटची भूमिका साकारणार असून कडक अ‍ॅक्शन करतानाही दिसणार आहे. दुसरीकडे, सोनाक्षी सिन्हा भुजमधील खेड्यातील एका मुलीच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर मोशन पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही सांगण्यात आली आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी भुजला 13 ऑगस्ट रिलीज होणार आहे. आपण हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर पाहू शकता.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Embed widget