प्रेक्षकांची 'भीड' नाहीच; राजकुमार रावचा चित्रपट ठरतोय फ्लॉप, तिसऱ्या दिवशी केली एवढी कमाई
भीड (Bheed) या चित्रपटात राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. जाणून घ्या या चित्रपटाचे कलेक्शन...
Bheed Box Office Collection Day 3: अभिनेता राजकुमार रावचा (Rajkummar Rao) भीड (Bheed) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटाचं कथानक कोरोनाकाळावर आधारित आहे. कोरोनाकाळात अनेक लोकांना समस्यांचा सामना करावा लागला. लॉकडाऊन दरम्यान अनेक जण आर्थिक अडचणींचा समाना करत होते. हे सर्व भीड या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा (Anubhav Sinha) यांनी केलं आहे. या चित्रपटाची थीम ब्लॅक अँड व्हाईट आहे. भीड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेक जण या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. पण आता हा चित्रपट फ्लॉप ठरतोय, असं अनेकांचे मत आहे. जाणून घेऊयात भीड या चित्रपटाचे कलेक्शन...
'भीड' चे कलेक्शन
भीड हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहे. ओपनिंग-डेला या चित्रपटानं 15 लाख रुपयांची कमाई केली. आता तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी (26 मार्च) भीड या चित्रपटानं 70 लाखांचे कलेक्शन केलं आहे. या चित्रपटानं तीन दिवसात 1.85 कोटींची कमाई केली.
भीडमध्ये 'या' कलाकारांनी साकारली भूमिका
भीड या चित्रपटात राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांच्यासोबतच आशुतोष राणा, दिया मिर्झा, संजय मिश्रा, कृतिका कामरा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. भीड या चित्रपटाचं क्रिटिक्सनं कौतुक केलं. सोशल मीडियावर देखील अनेकांनी या चित्रपटाचं प्रमोशन केलं. पण तरी देखील या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळत नाहीये, असा अंदाज चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून अनेक जण लावत आहेत.
View this post on Instagram
'भीड' च्या कामाईत होणार वाढ?
भीड या चित्रपटासोबत राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांनी बधाई दो या चित्रपटात देखील काम केलं आहे. बधाई दो चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. भीड या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी मुल्क आणि आर्टिकल 15 यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. अनुभव सिन्हा यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. पण आता त्यांच्या भीड या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल की नाही? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
महत्वाच्या इतर बातम्या:
Bheed Movie Review : मनाला भिडणारा 'भीड'; संवदेशनशीलता हरवलेल्यांसाठी आरसा