एक्स्प्लोर
भाई-भाई, सायकलिंग करताना सलमान-शाहरुखचा फोटो
मुंबई : एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, या न्यायाने बॉलिवूडचे दोन सुपरस्टार सलमान आणि शाहरुख यांच्यातही पूर्वी विस्तव जात नव्हता. मात्र एका इफ्तार पार्टीने दोघांना एकत्र आणलं आणि कट्टर प्रतिस्पर्धी अचानक एकमेकांचे गोडवे गायला लागले.
किंग खान शाहरुख आणि दबंग स्टार सलमान सायकलिंग करत असतानाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर उत्सुकतेचा विषय ठरत आहे. शाहरुखने सलमानसोबतचा हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
गुरुवारी रात्री शाहरुख-सलमानने थोडा मोकळा वेळ काढला आणि मुंबईच्या रस्त्यांवर सायकलिंगचा मनसोक्त आनंद लुटला. हा फोटो एसआरकेने सकाळी शेअर केला आणि सोशल मीडियावर तो लगेच व्हायरल झाला.
'भाई भाई ऑन बाईक बाईक. प्रदुषण शून्य. भाई म्हणतो मायकल लाल सायकल लाल' असं अनोखं कॅप्शनही शाहरुखने फोटोला दिलंय.
https://twitter.com/iamsrk/status/748676004856532993
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement