एक्स्प्लोर
'बाहुबली 2' सोबत प्रभासच्या नव्या सिनेमाचा टीझर
मुंबई : प्रेक्षकांना अभिनेता प्रभासच्या 'बाहुबली 2 : द कन्क्लूजन' या सिनेमाची मोठी उत्सुकता लागली आहे. या सिनेमासोबतच प्रेक्षकांना आणखी एक ट्रीट मिळणार आहे, ती म्हणजे प्रभासच्या पुढच्या अॅक्शन सिनेमाचा टीझर 'बाहुबली 2' सोबत रिलीज होणार आहे.
प्रभासच्या नव्या सिनेमाचं नाव अजून निश्चित झालेलं नाही. मात्र सिनेमाच्या बजेटचा मोठा हिस्सा अॅक्शन सीनच्या शूटिंगवर खर्च होईल, असं सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत यांचं म्हणणं आहे.
सिनेमाचे निर्माते सिनेमातील अॅक्शन सीनवरच तब्बल 35 कोटी रुपये खर्च करणार आहेत. प्रेक्षकांना या सिनेमाचा टीझर 'बाहुबली 2' सोबत पाहायला मिळणार आहे. सिनेमाला शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाचं संगीत असेल.
राजामौली यांचं दिग्दर्शन असलेल्या 'बाहुबली 2' सिनेमात पहिल्याच भागातील कलाकार म्हणजे प्रभास, राणा डुग्गुबती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बाहुबलीच्या विश्वासू कटप्पानेच त्याचे प्राण का घेतले, या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या भागात मिळणार आहे.
2015 मध्ये बाहुबलीचा पहिला भाग ‘बाहुबली : द बिगिनिंग’ रिलीज झाला होता. त्यानंतर जवळपास पावणेदोन वर्षांनी दुसरा भाग येत आहे. 28 एप्रिल 2017 रोजी ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि टीझर आणि ट्रेलर रिलीज झालं आहे.
VIDEO : 'बाहुबली 2' चा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
Advertisement