Bade Miyan Chhote Miyan Relase Date : अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफचा ‘बडे मियां छोटे मियां’ची रिलीज डेट जाहीर! ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Bade Miyan Chhote Miyan : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा ‘बडे मियां छोटे मियां’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bade Miyan Chhote Miyan Release Date : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या ‘बडे मियां छोटे मियां’ची (Bade Miyan Chhote Miyan) घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता खिलाडी कुमारने एक फोटो शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट शेअर केली आहे.
‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अली अब्बास जफर यांनी सांभाळली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळेल. प्रेक्षकांना आता फक्त या सिनेमाची उत्सुकता आहे. ‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमात टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
टायगर आणि अक्षयला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित या सिनेमाचा टीझर लवकरच आऊट होईल. अक्षय कुमारसह निर्मात्यांनी ‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
View this post on Instagram
‘बडे मियां छोटे मियां’ कधी रिलीज होणार? (Bade Miyan Chhote Miyan Release Date)
अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्यांने तीन महिन्यांनी सिनेमा रिलीज होणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच या वर्षात ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार असल्याचंही अभिनेत्याने सांगितलं आहे. खिलाडी कुमारने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”मोठ्या आणि छोट्याला भेटण्याची वेळ आला जवळ आली आहे. फक्त तीन महिने बाकी. ईद 2024”.
अक्षय कुमारने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आणि टायगर श्रॉफ दिसून येत आहे. दोघांनी मिलिट्री प्रिंट पॅन्ट आणि मॅचिंग रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तसेच या फोटोमध्ये एक हेलीकॉप्टरदेखील दिसून येत आहे. वासु भगनानी, जॅकी भगनानी आणि पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होत आहे.
‘बडे मियां छोटे मियां’ची तगडी स्टारकास्ट (Bade Miyan Chhote Miyan Starcast)
‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. तसेच मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, अलाया फर्नीचरवाला, रोनित रॉय आणि जुगल हंसराज महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
संंबंधित बातम्या