Bad Newz : तृप्ति डिमरी होणार जुळ्या मुलांची आई, दोन्ही बाळांचे वडील असणार वेगवेगळे; नेमकं प्रकरण काय?
Bad Newz : अभिनेत्री तृप्ति डिमरी (Tripti Dimri) आई होण्यासाठी सज्ज आहे. अभिनेत्रीचा 'बॅड न्यूज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं कथानक खूपच मजेदार असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता या चित्रपटाची प्रतीक्षा आहे.

Bad Newz : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal), तृप्ति डिमरी (Tripti Dimri) आणि एमी विर्क (Ammy Virk) अभिनीत 'बॅड न्यूज' (Bad Newz) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाच्या रिलीजसंदर्भात एक अपडेट समोर आली आहे. 'बॅड न्यूज' हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतचं या चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये प्रेग्नंट तृप्ति डिमरी अभिनेता विकी कौशल आणि एमी वर्कसोबत रोमान्स करताना दिसून आली होती. या चित्रपटाचं कथानक खूपच मजेदार असणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना मनोरंजनाचा धमाका मिळणार आहे.
अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि करीना कपूर (Karina Kapoor) यांच्या 'गुड न्यूज' या चित्रपटाप्रमाणे हा सिनेमादेखील मुलांच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात कमाल ट्विस्ट आहेत. रिपोर्टनुसार, चित्रपटात तृप्ति डिमरीला या चित्रपटात जुळी मुलं होतात. पण दोन्ही बाळांचे वडील मात्र वेगवेगळे असतात. जुळवा बाळांतील एक बाळ विकी कौशलचं तर दुसरं एमीचं असतं. 'बॅड न्यूज' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. 19 जुलै 2024 रोजी 'बॅड न्यूज' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासारखी गोष्ट तुम्ही आधी हिंदी सिनेमात कधीही पाहिली नसेल.
प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा डबल धमाका
'बॅड न्यूज' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा बंदिश बँडिटसारख्या वेब सीरिजचं दिग्दर्शन करणाऱ्या आनंद तिवारी यांनी सांभाळली आहे. तृप्ति डिमरी, विकी कौशल आणि एमी विर्क या तिघांनी प्रेक्षकांना सिनेमासोबत बांधून ठेवलं आहे. सॅम बहादुरनंतर अशा हलक्या-फुलक्या चित्रपटात विकी कौशलला पाहण्यासाठी सिनेप्रेमी उत्सुक आहेत. 'अॅनिमल'नंतर तृप्ति डिमरी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे.
View this post on Instagram
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) आणि तृप्ती डिमरीचा (Tripti Dimri) 'अॅनिमल' (Animal) हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमने-सामने होते. आता विकी कौशल आणि तृप्ति डिमरी एकत्र 'बॅड न्यूज' (Bad Newz) देण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या 'बॅड न्यूज' सिनेमाची नुकतीच घोषणा झाली आहे. 'बॅड न्यूज' या चित्रपटात विकी कौशल आणि तृप्ति डिमरीसह एमी विर्कदेखील (Ammy Virk) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. विकी कौशलने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून 'बॅड न्यूज'ची घोषणा केली होती. सिनेमाची घोषणा करण्यासोबत रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. या सिनेमाची घोषणा झाल्याने चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
संबंधित बातम्या























