Bachchan Pandey poster : खिलाडी अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षीत बच्चन पांडे चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित
Bachchan Pandey Trailer : अक्षय कुमारच्या बच्चन पांडे या चित्रपटाचा ट्रेलर 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
Bachchan Pandey Trailer Out Tomorrow : अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) लोकांमध्ये बच्चन पांडे (Bachchan Pandey) या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर तिकडे अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. अक्षय कुमारच्या बच्चन पांडे या चित्रपटाचा ट्रेलर 18 फेब्रुवारी रोजी 10:40 वाजता प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच अक्षय कुमारने स्वतःचे आणि क्रिती सेननचे एक पोस्टर शेअर केले आहे.
पोस्ट शेअर करताना अक्षयने केवळ ट्रेलरची वेळच जाहीर केली नाही तर त्याच्या कॅप्शनने लोकांची मने जिंकली आहेत. अक्षयने लिहिले आहे – "होळीच्या दिवशी बच्चन पांडे आणि क्रिती सेनॉनचे बाण सोडत, आपल्या खुर्चीचा पट्टा बांधा कारण यावेळी काहीतरी वेगळीच मजा येणार आहे, उद्या ट्रेलर रिलीज होणार आहे."
View this post on Instagram
नवीन पोस्टरमध्ये अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉनची पोझ खूप छान आहे. दोघेही दमदार मार्गाने रॉकवर येत आहेत. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. साजिद नाडियादवालाच्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमार त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहे. त्यामुळे उद्या (18 फेब्रुवारी रोजी) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.
फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, क्रिती सेनॉन, जॅकलिन फर्नांडिस आणि अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 18 मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rashmika Mandanna-Vijay Deverakonda : विजय देवरकोंडासोबत जोडलं जातंय रश्मिकाचं नाव ; लग्नाबाबत नॅशनल क्रश म्हणाली...
- Devednra Fadnavis, Amruta Fadnavis : काय म्हणता? देवेंद्र फडणवीस पातेलंभर तुपासकट 30 ते 35 पोळ्या खायचे, अमृता फडणवीसांनीच सांगितलं...
- Salman Khan : सलमान एका महिन्यात कमावतो कोट्यवधी ; एकूण संपत्ती माहितीये?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha