एक्स्प्लोर

संजय जाधव यांनी 'ये रे ये रे पैसा 2' का सोडला?

आतली बातमी ऐकाल तर थक्क व्हाल. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दादा नाही म्हटल्यावर तेजस्विनी पंडित आणि उमेश कामत या कलाकारांनी दुसऱ्या भागातून आपलं अंग काढलं आहे.

गेला सोमवार इंडस्ट्रीसाठी फार महत्त्वाचा होता. मराठीबद्दल म्हणाल, तर अक्षय कुमारने 'चुंबक'चं प्रमोशन केलं. तिकडे राज ठाकरे यांनी मांजरेकरांच्या पुलंवरच्या सिनेमाला क्लॅप दिला. हे सगळं सुरु असताना आणखी एका सिनेमाने या दिवशी चोरटी धाव घेतली. त्या सिनेमाचं नाव आहे 'ये रे ये रे पैसा २' होय... संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा' यापूर्वी आला होता. यात उमेश कामत, तेजस्विनी पंडित, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर अशी फळी होती. त्याच्याच सिक्वेलची घोषणा परवा झाली. पण त्यातून नवाच प्रश्न उभा राहिला. खरंतर पहिला भाग होता संजय जाधव यांचा. पण दुसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी टाकण्यात आली आहे हेमंत ढोमेंवर. अरेच्चा.. साक्षात 'दुनियादारी' फेम संजय जाधव यांची गच्छंती झाली कशी? की कुणी केली? बाबो.. आतली बातमी ऐकाल तर थक्क व्हाल. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दादा नाही म्हटल्यावर तेजस्विनी पंडित आणि उमेश कामत या कलाकारांनी दुसऱ्या भागातून आपलं अंग काढलं आहे. बाकी पहिल्या भागात असलेले मृणाल, संजय, सिद्धार्थ बहुधा असतील दुसऱ्या भागात. आणि आता जाता जाता सांगू चोरट्या धावेबद्दल. तर परवा संध्याकाळी 'भाई' या सिनेमाची घोषणा होणार होती. त्यावेळी  त्याच्या प्रदर्शनाची 4 जानेवारी 2019 ही तारीखही जाहीर होणार होती. ही आतली बातमी लागल्यानंतर सिनेमाची घोषणा व्हायच्या काही तास आधी 'ये रे ये रे पैसा २' वाल्यांनी 4 जानेवारीवर आधीच क्लेम लावला. आता 'भाईं'ची गोची झाली ना. सगळं ठरलेलं असताना कुणीतरी एका झटक्यात तोंडची तारीख काढून घेऊन जावी, असं झालं ना हे. तुम्ही म्हणता मराठी निर्मात्यांमध्ये तारखांबाबत कम्युनिकेशन नसतं. अरे हाट.. भक्कम कम्युनिकेशन असतं. म्हणून तर अशा धावा घेऊन सामना जिंकता येतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget