Balgandharva Movie: नारायण श्रीपाद राजहंस' यांचा खडतर प्रवास मांडणाऱ्या 'बालगंधर्व' ला 12 वर्ष पूर्ण; सुबोध भावे, रवी जाधव यांची खास पोस्ट
"बालगंधर्व" (Balgandharva) हा चित्रपट रिलीज होऊन 12 वर्ष झाली आहेत. या निमित्तानं अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Balgandharva Movie: 'बालगंधर्व' हे नाव रंगभूमीप्रेमी तसेच नाट्य रसिकाच्या मनातलं सोनेरी पानं. नारायण श्रीपाद राजहंस यांची कथा "बालगंधर्व" (Balgandharva) या चित्रपटात मांडण्यात आली आहे. ज्या काळात स्त्रियांना रंगमंचावर अभिनय सादर करण्यास समाज मान्यता नव्हती त्याच काळात स्त्री भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांचा प्रवास "बालगंधर्व" या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट रिलीज होऊन 12 वर्ष झाली आहेत. या निमित्तानं अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अभिनेता सुबोध भावेनं सोशल मीडियावर बालगंधर्व चित्रपटामधील एका सिनचा फोटो शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, आज 12 वर्षे झाली "बालगंधर्व" चित्रपट प्रदर्शित होऊन.' सुबोधच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
रवी जाधव यांची पोस्ट
रवी जाधव यांची "बालगंधर्व" या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. 'आज एक तप झाले "बालगंधर्व" हा माझा पहिला ‘बायोग्राफीकल’ चित्रपट प्रदर्शित होऊन जो आमच्या टिमच्या आणि प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राहील! उद्या तब्बल 12 वर्षांनी माझ्या दुसऱ्या ‘बायोग्राफीकल’ चित्रपट ‘मै अटल हूँ’ च्या चित्रीकरणाचा प्रारंभ होत आहे. असाच आशिर्वाद असावा!'
View this post on Instagram
सुहास जोशी,किशोर कदम,अविनाश नारकर, विभावरी देशपांडे यांनी देखील बालगंधर्व या चित्रपटात प्रमुख भूमिका साकरली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधवनं केलं असून चंद्रकांत प्रॉडक्शन प्रा या बॅनर अंतर्गत नितीन चंद्रकांत देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 6 मे 2011 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटानं बॉक्सवर चांगली कमाई केली असून या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :