एक्स्प्लोर

हिरे कारखान्यातील कामगार ते 'बाहुबली'चा साऊंड डिझायनर

मुंबई : कटप्पानं बाहुबलीला का मारलं याचं कोडं आता उलगडलं आहे. एक हजार कोटींचा गल्ला जमवण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या 'बाहुबली 2' या चित्रपटानं अनेकांना नवी ओळख दिली आहे. फक्त प्रभास, राणा, अनुष्का, तमन्ना, रम्या यांसारखे प्रथितयश कलाकारच नाही, तर पडद्यामागील अनेक चेहरेही या निमित्ताने यशोशिखरावर पोहचत आहेत. बाहुबली 2 च्या यशामध्ये खारीचा वाटा असलेला एक म्हणजे मनोज गोस्वामी. कधीकाळी सुरतमध्ये हिऱ्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या मनोजचं बाहुबली कनेक्शन तुम्हाला अचंबित करेल. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे सुरतच्या हिरे कारखान्यात बालमजुरी करणारा मनोज गोस्वामी देशातल्या सर्वात भव्य सिनेमाचा साऊंड डिझायनर झाला आहे. गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातून मुंबईत येण्याचा त्याचा प्रवास एका स्वप्नासारखाच आहे. दक्षिणेतला अनगनग हा मनोजचा साऊंड इंजिनिअर म्हणून पहिला सिनेमा. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी सिनेमेही केले. सावरिया, कमिने, सात खून माफ, तलाश, हैदर, इश्किया, एक थी डायन याशिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट सारख्या सिनेमांसाठी मनोजनं साऊंड डिझायनरचं काम केलं. या सगळ्या चित्रपटांपैकी बाहुबलीचा अनुभव काही वेगळाच होता. अनगनग हा सिनेमा बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौलींचे गुरु के राघवेंद्र राव यांच्या मुलानं बनवला होता. त्यातील काम राजामौलींना आवडलं आणि मनोज यांना बाहुबलीचं काम मिळालं. कितीही लपवला तरी खऱ्या हिऱ्याचा प्रकाश लपत नाही असं म्हणतात. मनोजच्या बाबतीतही काहीसं असंच घडलं. हिऱ्याला पॉलिश करणाऱ्या या मुलानं आपल्या कौशल्याच्या जोरावर एक लखलखीत करिअर घडवलं आहे. ‘बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी (देवसेना), रम्या कृष्णन (शिवगामी), राणा डुग्गुबाती (भल्लालदेव), सत्यराज (कटप्पा), तमन्ना भाटिया (अवंतिका) यांच्या भूमिका आहेत. बाहुबली 1 चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.

संबंधित बातम्या

मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन

बाहुबलीमध्ये शिवगामीने वाचवलेलं 'ते' बाळ कोण?

'बाहुबली 2'साठी प्रभासने 10 कोटींची जाहिरात नाकारली!

बाहुबली 2 ने याड लावलं! पहिल्या आठवड्यात विक्रमी कमाई

'बाहुबली 2' दरम्यान 132 जाहिराती, थिएटरवर कारवाईची मागणी

म्हणून बाहुबली इतकाच भल्लाल मनावर छाप पाडतो..

बाहुबलीला मरण्यासाठी 25 कोटी रुपये तर कटप्पाला केवळ….!

‘बाहुबली 2’ ची चौथ्या दिवशीची कमाई किती?

सलमान-आमीरवर मात, शाहरुखचा विक्रम मोडण्यात प्रभास अपयशी

बाहुबली बनवणारे राजमौली कोण?

सर्व विक्रम मोडीत, ‘बाहुबली 2’ ची विकेंडला ऐतिहासिक कमाई

भल्लालदेवला फक्त एकाच डोळ्यानं पाहता येतं!

‘बाहुबली 2’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई

उस्मानाबादेत टुरिंग टॉकिजमध्ये बाहुबली 2, तिकीट अवघं..

अंडरटेकरची भेट, ते मानधन, ‘बाहुबली’च्या 15 फॅक्ट्स !

‘बाहुबली 2’ पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? उत्तर मिळणार?

दुबईत ‘बाहुबली 2’ प्रदर्शित, कटप्पा-बाहुबलीचं उत्तर मिळालं?

‘बाहुबली 2’ मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!

‘बाहुबली 2’ चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटक

पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’कडे प्रेक्षकांची सपशेल पाठ

कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…

‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट

रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर

VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget