'पठाण नाही तर नेटफ्लिक्सवरचा अॅन अॅक्शन हिरो पाहा' नेटकऱ्याचं ट्वीट; आयुष्मान म्हणाली, 'थँक्यू पण हे...'
एका नेटकऱ्यानं अभिनेता आयुष्मान खुराणाच्या (Ayushmann Khurrana) अॅन अॅक्शन हिरो (An Action Hero) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
Action Hero: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत, तर काही लोक या चित्रपटाला ट्रोल करत आहेत. या चित्रपटाला ट्रोल करत एका नेटकऱ्यानं ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये या नेटकऱ्यानं अभिनेता आयुष्मान खुराणाच्या (Ayushmann Khurrana) अॅन अॅक्शन हिरो (Action Hero) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आता या नेटकऱ्याच्या ट्वीटला आयुष्माननं रिप्लाय दिला आहे.
नेटकऱ्याचं ट्वीट
'पठाण नाही तर नेटफ्लिक्सवरचा अॅन अॅक्शन हिरो पाहा. या चित्रपटाचे डायलॉग, संगीत हे खूप चांगले आहेत. तसेच आयुष्यामनं देखील चांगलं काम केलं आहे.' असं ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं आहे. आता या ट्वीटला आयुष्माननं रिप्लाय दिला आहे.
Screw Pathan, watch Action Hero on Netflix! Story, dialogues, background music, the subtle middle finger shown to Indian news channels and their crass reporting, @ayushmannk has KILLED it! But my fav was the guy mimicking Arnab
— Mubina Kapasi (@MubinaKapasi) February 2, 2023
आयुष्मानचा रिप्लाय
आयुष्मान खुराणानं त्या नेटकऱ्याच्या ट्वीटला रिप्लाय दिला, 'अॅक्शन हिरो तुम्हाला आवडला, त्याबद्दल थँक्यू पण हे पहिले वाक्य तुम्ही टाळू शकता. कारण मी शाहरुखचा फॅन आहे.' आयुष्मानच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Thanks for loving An Action Hero. 😎
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) February 3, 2023
Could’ve avoided the first line though 😇 I’m an SRKian!
अनिरुद्ध अय्यर यांनी आयुष्यामनच्या अॅन अॅक्शन हिरो (An Action Hero) या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मानसोबतच जयदीप अहलावतनं देखील प्रमुख भूमिका साकारलेली आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल. राय यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
पठाणची बॉक्स ऑफिसवर जादू
पठाण या चित्रपटानं दहा दिवसात जवळपास एकूण 379.18 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट जगभरात देखील ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा चित्रपटात जगभरात 700 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे.
महत्वाच्या इतर बातम्या: