Ayushmann Khurrana Birthday : एकेकाळी ट्रेनमध्ये गाणं गायचा 'हा' अभिनेता, पहिल्याच चित्रपटामुळे झाला सुपरस्टार; आता कोट्यवधींचा मालक
Ayushmann Khurrana Birthday : अभिनेता आयुष्मान खुराना याने 2012 मध्ये विकी डोनर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.
Ayushmann Khurrana Birthday : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणं म्हणजे सर्वात मोठं आव्हान, त्यातच तुमचा कुणी गॉडफादर नसेल, तर हे जवळजवळ अशक्य असल्याचं म्हटलं जातं. अनेक कलाकारांचं आयुष्य याचं प्रयत्नात संपत पण त्यांना ओळख मिळत नाही. काही स्टार्स मात्र पहिल्याच प्रयत्नात प्रसिद्धी मिळवण्यात यशस्वी होतात. यामागे त्यांची मेहनत आणि जिद्द दिसून येते. अभिनेता आयुष्मान खुराना हे असंच एक नाव. अभिनेता आयुष्मान खुराना याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल रंजक गोष्टी जाणून घ्या.
'आऊट ऑफ द बॉक्स' विषयांना हात घालणारा अभिनेता
अभिनेता आयुष्मान खुराना याने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहमी आऊट ऑफ द बॉक्स विषयांना हात घालणारा हा अभिनेता. हटके आणि वास्तववादी विषय आयुष्मानने खूप चांगल्याप्रकारे मोठ्या पडद्यावर मांडले आहेत. फिल्म इंडस्ट्रीत त्याचा कुणी गॉडफादरही नव्हता. मेहनत आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर आयुष्मानने आजपर्यंत अनेक हिट आणि अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
रिॲलिटी शोचा स्पर्धक ते बॉलिवूडचा सुपरस्टार
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी आयुष्मानने रिॲलिटी शोचा भाग बनणे, अँकर बनणे, शोचा विजेता बनणे आणि जज बनणे असा प्रवास केला होता. आयुष्मानने स्वतःचा ठसा उमटवला आहे. प्रतिभावान स्टार आयुष्मान एकेकाळी ट्रेनमध्ये गाणे म्हणायचा. आयुष्मान खुरानाने 2012 मध्ये अभिनयाच्या जगात प्रवेश केला. त्याच्या एका चित्रपटाचा सस्पेन्स पाहिला तर दृष्यमचा सस्पेन्स विसरून जाल. आयुष्मान खुरानाने आतापर्यंत 'विकी डोनर', 'बधाई हो', 'दम लगाके हईशा' सारखे अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटांच्या कमाईने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला.
एकेकाळी ट्रेनमध्ये गाणं गायचा 'हा' अभिनेता
आयुष्मानने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, दिल्ली ते मुंबईच्या ट्रेममध्ये तो गाणं गायचा. यावेळी तो म्हणाला होता की, "त्यावेळेस आमच्याकडे खूप कमी पैसे होते आणि आम्ही खूप मजा करायचो. आम्ही ट्रेनमध्ये गाणी म्हणायचो आणि लोक आम्हाला यासाठी पैसे द्यायचे. एकदा लोकांना आमचे गाणं खूप आवडलं होते. त्यांनी आम्हाला खूप पैसे दिले, त्यानंतर मी माझ्या मित्रांसोबत गोव्याला गेलो होतो".
पहिल्याच चित्रपटामुळे झाला सुपरस्टार
'विकी डोनर' चित्रपटाला यश मिळाल्यानंतर आयुष्मान खुरानाला प्रसिद्धी मिळाली. स्पर्म डोनेशनबद्दल समाजात पसरलेला गैरसमज या चित्रपटाद्वारे दूर केला. शुजित सरकारच्या या चित्रपटाचे भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप कौतुक झालं. अतिशय गंभीर विषय या चित्रपटाद्वारे अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला गेला. या चित्रपटातील स्टारकास्टसोबतच दिग्दर्शक आणि निर्मात्याचेही भरभरून कौतुक झाले.
आता कोट्यवधींचा मालक
2018 मध्ये त्याचा अंधाधुन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील सस्पेंन्सने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. तब्बू, आयुष्मान खुराना आणि राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाच्या दमदार कथानकामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले होते. 'अंधाधुन' चित्रपटाने 440 कोटींची कमाई केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता आयुष्मान खुराना सुमारे 80 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
आयुष्मान खुरानाचा 'बधाई हो' हा चित्रपट प्रचंड गाजला. 2022 हे वर्ष आयुष्मानच्या करिअरसाठी वरदान ठरलं. 'बधाई हो' चित्रपटाने बजेटपेक्षा जवळपास नऊ पट अधिक कमाई करून निर्मात्यांना नफा मिळवून दिला. सकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने भारतात 137 कोटी रुपये आणि जगभरात 220 कोटी रुपयांची कमाई केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :