Ashish Vidyarthi : "आता सगळं संपलं"; आशिष विद्यार्थींच्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत
Ashish Vidyarthi : आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ashish Vidyarthi First Wife Piloo Vidyarthi Post : लोकप्रिय अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे नवा संसार थाटण्यासाठी आशिष सज्ज आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पहिल्या पत्नीने राजोशी बरुआ म्हणजेच पीलू विद्यार्थीने (Piloo Vidyarthi) सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. सर्व काही संपलं असं म्हणत ती स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचं या पोस्टमधून कळतं आहे.
आशिष यांच्या दुसऱ्या लग्नाचं त्यांच्या पहिल्या पत्नीला खूप वाईट वाटत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिलं आहे,"तुम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे का? असा प्रश्न एक चांगला व्यक्ती तुम्हाला विचारणार नाही. तो असा प्रश्न तेव्हाच उपस्थित करेल जेव्हा त्याला माहित असेल की तो तुम्हाला त्रास देईल. हे लक्षात ठेवा".
पीलू विद्यार्थीने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"एखाद्या गोष्टीचा खूप विचार केल्याने गोंधळून जायला होतं. आता सगळं संपलं आहे, असं वाटतं. पण आता आयुष्यात शांती येऊदेत. तुम्हालाही आशीर्वाद मिळावा कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात". राजोशीने सोशल मीडियावर एक फोटोदेखील शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"चाकोरीबद्ध आयुष्य जगू नका".
View this post on Instagram
आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या पत्नीबद्दल जाणून घ्या... (Ashish Vidyarthi First Wife)
आशिष विद्यार्थी वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत. आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या पत्नीचे नाव राजोशी बरुआ उर्फ पीलू विद्यार्थी आहे. पीलू या अभिनेत्री आणि गायिका आहेत. 'इमली' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत त्यांनी काम केलं आहे.
पश्निम बंगालमध्ये जन्मलेल्या पीलू या बंगाली अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची कन्या आहेत. आईमुळेच त्यांना अभिनयाची गोडी लागली. 1993 साली 'टाइम्स एफएम'मध्ये रेडिओ जॉकी म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. 2019 साली त्यांनी 'सुहानी सी एक लडकी' या मालिकेत काम केलं. पीलू आणि आशिष यांच्या मुलांचं नाव अर्थ विद्यार्थी असं आहे.
संबंधित बातम्या