Asha Bhosle Amruta Fadnavis : "गाण्याचा सराव कर आणि..."; आशा भोसलेंचा अमृता फडणवीसांना सल्ला
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी नुकतीच आशा भोसलेंची (Asha Bhosle) भेट घेतली आहे.
Asha Bhosle Amruta Fadnavis : ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी आपल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांना नुकताच राज्य सरकारच्या सर्वोच्च असलेल्या 'महाराष्ट्र भूषण' (Maharashtra Bhushan) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नुकतीच आशा भोसले (Asha Bhosle) यांची भेट घेतली आहे.
आशा भोसलेंचा अमृता फडणवीसांना मोलाचा सल्ला
अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर आशा भोसले यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"आशा भोसले यांची नुकतीच भेट घेतली आणि 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदनदेखील केलं. संगीताबद्दल त्यांच्यासोबत छान संवाद साधला. तसेच त्यांनी मला गाण्याचा सराव कसा करावा आणि व्हॉइस मॉड्युलेशनबद्दल मार्गदर्शनदेखील केलं. आता संगीत सत्रातील पुढील सरावासाठी मी उत्सुक आहे".
View this post on Instagram
अमृता फडणवीस यांचे आशा भोसलेंसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते कमेंट्स करत शुभेच्छा देत आहेत. 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार मिळाल्यानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या की,"महाराष्ट्र भूषण' हा सन्मान घरच्यांनी दिला आहे. तो मला भारतरत्ना सारखा आहे".
अमृता फडणवीस या बॅंकर असण्यासोबत गायिकादेखील आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. आता त्यांनी आशा भोसले यांच्यासोबतचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोत त्या आशा भोसले यांच्या सोबत दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत त्या आशा भोसले यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत.
आशा भोसले यांनी त्यांचं पहिलं गाणं 'माझं बाळ' या सिनेमासाठी गायलं. त्यावेळी त्या 10 वर्षांच्या होत्या. अमृता फडणवीस यांनीदेखील आजवर अनेक गाणी गायली आहेत. त्यांची 'मूड बना लिया','वो तेरे प्यार का गम', 'मोरया रे','वो तेरे प्यार का गम', 'तिला जगू द्या','शिव तांडम स्त्रोतम', 'सारे जहॉं से अच्छा' ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
संबंधित बातम्या