Article 370 : 'आर्टिकल 370'मध्ये अमित शाह यांच्या भूमिकेत झळकणार 'हा' अभिनेता; तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार अरुण गोविल
Article 370 : 'आर्टिकल 370' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Article 370 Kiran Karmarkar Playing Amit Shah Role : यामी गौतमचा (Yami Gautam) 'आर्टिकल 370' (Article 370) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आदित्य जांभले (Aditya Jamble) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 'आर्टिकल 370'मध्ये अमित शाह (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भूमिकेत कोण झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
आदित्य धर यांनी 'आर्टिकल 370' या सिनेमाची निर्मिती केली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमातील प्रत्येक पात्राचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. प्रियामणि, वैभव तत्ववादी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी आपल्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'आर्टिकल 370' या सिनेमाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.
View this post on Instagram
'आर्टिकल 370'मध्ये अमित शाह यांची भूमिका कोण साकारणार?
'आर्टिकल 370' या सिनेमात अमित शाह यांची भूमिका किरण कर्माकर साकारणार आहे. किरण यांनी अमित शाह यांची भूमिका चोख निभावली आहे. एक वेगळा विषय असल्याने हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे.
'आर्टिकल 370' कधी रिलीज होणार? (Article 370 Release Date)
'आर्टिकल 370' या सिनेमाचं शूटिंग काश्मीरमध्ये करण्यात आले होते आणि या चित्रपटाची कथा एका स्थानिक फील्ड एजंटभोवती फिरते जो एक गुप्त मिशनमध्ये आहे. 'आर्टिकल 370' या चित्रपटाचं दिग्दर्शन सुहास जांभळे यांनी केले असून आदित्य धर, लोकेश धर आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपाटी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.
'आर्टिकल 370' स्टार कास्ट (Article 370 Starcast)
'आर्टिकल 370' या सिनेमात प्रियामणी, अरुण गोविल, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार, इरावती हर्षे मायादेव हे कलाकार देखील महत्वाची भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षक 'आर्टिकल 370' या सिनेमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. तगडी स्टारकास्ट असणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करेल.
संबंधित बातम्या