Arijit Singh: कोमामध्ये गेलेल्या अभिनेत्रीच्या मदतीला धावून आला अरिजित सिंह; सोशल मीडियावर होतंय कौतुक
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंहनं (Arijit Singh) आता अँड्रिला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकरी पोस्ट शेअर करुन अरिजित सिंहचं कौतुक करत आहेत.
Arijit Singh: बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्माची (Aindrila Sharma) प्रकृती ही गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. अँड्रिला ही कोमात असून तिच्या उपचारासाठी तिच्या कुटुंबाने आतापर्यंत 12 लाखांचा खर्च केला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंहनं (Arijit Singh) आता अँड्रिला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकरी पोस्ट शेअर करुन अरिजित सिंहचं कौतुक करत आहेत.
सोशल मीडियावर अरिजित सिंहचे चाहते ट्विटरवर कमेंट करत अरिजित सिंहचे कौतुक करत आहेत. एका यूजरने ट्विट करून अरिजितला 'किंग ऑफ हार्ट' असं म्हटले आणि त्याला आशीर्वाद दिला आहे. पाहा नेटकऱ्यांचे ट्वीट्स-
We know who is #ArijitSingh
— ⓈⒶⒾⓀⒶⓉ ⒹⒺⓎ (@SAIKATD19929805) November 19, 2022
The king of heart ❤️
Blessings for #oindrilasharma 🙏 pic.twitter.com/qFTl2sCAGW
1 नोव्हेंबर 2022 रोजी 25 वर्षीय अँड्रिला शर्माला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर तिची प्रकृती खालावली. गायक अरिजित सिंग हा अँड्रिला हिला मदत करण्यासाठी पुढे आला आहे. अँड्रिलाच्या उपचाराचा खर्च अरिजित करणार आहे, असं म्हटलं जात आहे. अरिजित सिंह हा अभिनेत्रीच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. अँड्रिला मुर्शिदाबाद येथील आहे, हे अरिजित सिंहचे मूळ गाव आहे. म्हणूनच अरिजितनं अँड्रिला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
0% Attitude. 100% Quality. #ArijitSingh pic.twitter.com/I7N0xd8pPP
— Nishit Shaw (@NishitShawHere) November 12, 2022
Singer Arijit Singh to bear the medical expenses of Aindrila Sharma.
— Arijit Singh_FC7 (@ArijitSingh_FC7) November 18, 2022
Men with golden heart ❤️#LetThereBeLight #Humanity #ArijitSingh https://t.co/9gXbp71ev6
अँड्रिला शर्माने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तिने 2007 मध्ये 'झूमर' या टीव्ही शोमधून पदार्पण केले. अँड्रिला सोशल मीडियावरही खूप फॅन-फॉलोइंग आहेत, अँड्रिला शर्माचे इंस्टाग्रामवर 152000 फॉलोअर्स आहेत. अँड्रिला ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Drishyam 2: बॉक्स ऑफिसवर अजय देवगणची जादू; 'दृश्यम 2' नं दुसऱ्या दिवशी केली रेकॉर्ड ब्रेक कमाई