AR Rahman Divorce: 29 वर्षांनंतर डिव्होर्स, आई वडिलांच्या घटस्फोटावर ए. आर रेहमानच्या मुलांची प्रतिक्रीया,सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हणाले..
ए आर रेहमानला तीन मुलं आहेत. खतिजा, रहीमा आणि आमीन या तिघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या घटस्फोटाबाबत पोस्ट टाकली आहे.

AR Rahman Divorce: ऑस्कर विजेता लोकप्रीय संगीतकार ए, आर रेहमान आणि त्यांनी पत्नी सायरा विभक्त होणार असल्याची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. ए आर रेहमानची पत्नी सायरा बानो यांच्या वकिलांनी नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं सांगितल्यानंतर ए. आर रेहमानच्या मुलांनीही त्याची X माध्यमावरची पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ए आर रेहमानला तीन मुलं आहेत. खतिजा, रहीमा आणि आमीन या तिघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आमच्या खासगी आयुष्याला आदरपूर्वक हाताळल्याबद्दल धन्यवाद अशा अर्थाची पोस्ट ए आर रेहमानच्या मुलांनी केली आहे. एआर रहमान आणि त्याची पत्नीने लग्नाच्या 29 वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
आमीनने प्रायव्हसीचा आदर करण्याचं केलं आवाहन
घटस्फोटाच्या घोषणेनंतर ए आर रेहमानचा मुलगा आमीन रेहमानने आमच्या प्रायव्हसीचा आदर का असं सांगणारी एक इंस्टाग्रॅम स्टोरी टाकली आहे. तुम्ही आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद असं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय. ए आर रेहमानच्या मुलीनंही वडिलांची पोस्ट शेअर करत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असू द्या अशी प्रार्थना तिनं केली आहे.

"आम्ही सहजीवनाची ३० वर्षे पूर्ण करू अशी आम्हाला आशा होती पण, प्रत्येक गोष्टीचा एक अप्रत्यक्ष अंत असतो. एखादी गोष्ट विखुरली तर ती पुन्हा जोडली जाऊ शकत नाही, एकदा विखुरलेले तुकडे पुन्हा जोडले तरीही त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. या कठीण काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करा अशी पोस्ट ए आर रेहमाननं केली होती.
ए. आर रेहमानच्या पोस्टनं चाहत्यांमध्ये हॅशटॅगची चर्चा
लोकप्रीय संगीतकार ए. आर रेहमान यांनी x माध्यमावर आपल्या पत्नीशी घटस्फोट घेत असल्याची बातमी शेअर केल्यानंतर या पोस्टखाली #arsairabreakup हा हॅशटॅग त्यांनी टाकला होता. यावर चाहत्यांमध्ये अशा प्रसंगातही हॅशटॅग वापरणं योग्य नसल्याच्या कमेंटस या पोस्टखाली येत आहेत. अनेकांना या ट्विटखाली ए. आर रेहमानने टाकलेला हॅशटॅग खटकला आहे.
हेही वाचा:
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष





















