AR Rahman Divorce: लग्नाच्या 29 वर्षांनी सूर बिनसले, एआर रहमान आणि सायरा बानो घेणार घटस्फोट, पोस्ट करत म्हणाला...
AR Rahman Divorce: संगीतकार आणि ऑस्कर विजेता एआर रहमान आपल्या पत्नीला घटस्फोट देणार आहे. 29 वर्षांच्या लग्नानंतर एआर रहमान आणि सायरा बानो यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
AR Rahman Divorce: संगीतकार आणि ऑस्कर विजेता एआर रहमानच्या (AR Rahman) वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. एआर रहमान आणि त्याची पत्नीने लग्नाच्या 29 वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एआर रहमान आणि सायरा बानो यांनी 1995 मध्ये लग्न केले. त्यांना तीन मुले आहेत. एआर रहमानच्या मुलानेही त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट करत भाष्य केलं आहे.
ए आर रहमानची पत्नी सायरा बानोच्या वकिलाने एक निवेदन जारी करून त्यांच्या घटस्फोटाचे कारण सांगितले आहे. त्यानुसार त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि अशा परिस्थितीत सायराने पतीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ही बातमी समोर आल्यानंतर वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ न करण्याचंही आवाहन केलं आहे.
सायरा बानोच्या वकिलांनी काय म्हटलं?
सायरा बानोचे वकील म्हणाले की, लग्नाच्या अनेक वर्षानंतर सायराने पती एआर रहमानपासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. त्यांच्या नात्यातील भावनिक तणावानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. एकमेकांवर त्यांचे नितांत प्रेम असूनही, या जोडप्याला असे आढळून आले आहे की तणाव आणि अडचणींमुळे त्यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे. याच निवेदनात सायरा बानोने पुढे म्हटलं की, वेदना आणि त्रासामुळे मी हा निर्णय घेतला आहे. या आव्हानात्मक काळात, मी लोकांकडून समजूतदारपणाची अपेक्षा करत आहे. कारण हा आयुष्यातला कठीण टप्पा आहे.
ए.आर.रहमानच्या मुलानेही शेअर केली पोस्ट
एआर रहमानच्या मुलाने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, आम्ही विनंती करतो की, या कठीण काळात आम्ही वैयक्तिक आयुष्यात कुणीही ढवळाढवळ करु नये. आम्हाला समजून घेण्यासाठी धन्यवाद...