एक्स्प्लोर
Advertisement
रोममध्ये हनीमून, 'विरानुष्का'चा लग्नानंतरचा पहिला भन्नाट सेल्फी
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं लग्न इटलीत पार पडल्यानंतर ते हनीमूनसाठी रोमला रवाना झाले.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं लग्न इटलीत पार पडल्यानंतर ते हनीमूनसाठी रोमला रवाना झाले. यावेळी रोममधील आपला पहिला सेल्फी अनुष्कानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनुष्का आणि विराट बर्फाळ परिसरात असल्याचं या फोटोमध्ये दिसतं आहे. या फोटोसोबत In heaven , literally.. असंही तिनं म्हटलं आहे.
सुत्रांच्या मते, विराट आणि अनुष्का हे हनीमूनसाठी रोमला गेले आहेत. मंगळवारी तीन वाजेच्या दरम्यान हे दोघंही इटलीहून रवाना झाले होते. 11 डिसेंबरला विराट आणि अनुष्का हे लग्नाच्या बेडीत अडकले होते. इटलीच्या सियेनामधील बोर्गो फिनोकियोतो या ऐतिहासिक आणि सर्वात महागड्या रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा संपन्न झाला होता. त्यानंतर हे जोडपं रोमसाठी हनीमूनला गेले असून तिथून ते भारतात परतणारा आहेत. 21 डिसेंबरला दिल्ली आणि 26 डिसेंबरला मुंबईत त्यांनी रिसेप्शनही आयोजित केलं आहे. दरम्यान, अनुष्काने त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या इकोफ्रेण्डली पत्रिकेची निवड केली आहे. या पत्रिकेसोबत एक रोपटं पाहुण्यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश विरुष्काने या पत्रिकेच्या माध्यमातून दिला आहे. संबंधित बातम्या : विराट-अनुष्काचं 'इकोफ्रेण्डली' रिसेप्शन कार्ड! 'विरानुष्का'ला इटलीचं रिसॉर्ट 'या' सेलिब्रेटी कपलने सुचवलं विराटला प्रपोज करणाऱ्या तरुणीच्या 'विरानुष्का'ला एका शब्दात शुभेच्छा! विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीची नेमकी किंमत किती? पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा VIDEO : 'विरानुष्का'चं लग्न झालेलं 'हेच' ते खास ठिकाणं! विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो! विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement