Virat Kohli and Anushka Sharma : डिव्हिलियर्सची डिलिव्हरीची बातमी खरी? विराट-अनुष्का दुसऱ्यांदा होणार आई-बाबा; भारतात नव्हे तर 'या' देशात देणार बाळाला जन्म
Virat Kohli Anushka Sharma Second Child : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा होण्यासाठी सज्ज आहेत. दरम्यान हर्ष गोयनकाच्या एका ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Virat Kohli Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होण्यासाठी सज्ज आहेत. अद्याप जोडप्याने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. अनुष्का परदेशात आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हर्ष गोयनका यांचं ट्वीट काय? (Harsh Goenka Tweet)
उद्योगपती हर्ष गोयनका यांच्या एका ट्वीटमुळे अनुष्काच्या प्रेग्नंसीची चांगलीच चर्चा रंगली आहे. हर्ष गोयनका यांच्या एक्स अकाऊंटवरील ट्वीटने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यांनी लिहिलं आहे,"काही दिवसांतच एका बाळाचा जन्म होणार आहे. आता हे बाळ भविष्यात आपल्या वडिलांप्रमाणे क्रिकेटर होणार की आईसारखं सिनेसृष्टी गाजवणार हे पाहावे लागेल. बाळाचा जन्म लंडनमध्ये होणार आहे".
A new baby is to be born in the next few days! Hope the baby takes India to great heights like the greatest cricketing father. Or will it follow the mother and be a film star? #MadeInIndia #ToBeBornInLondon
— Harsh Goenka (@hvgoenka) February 13, 2024
विराट आणि अनुष्काने आपल्या पहिल्या प्रेग्नंसीची माहिती 2020 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. त्यानंतर 2021 मध्ये अनुष्काने लाडक्या लेकीला अर्थात वामिकाला जन्म दिला. विराट-अनुष्का आणि वामिकाचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात.
डिव्हिलियर्सची डिलिव्हरीची बातमी खरी?
अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची माहिती क्रिकेटरचा खास मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB Devilliers) ट्वीट करत दिली होती. पण नंतर त्याने आपलं विधान मागे घेत माफीनामा जाहीर केला. आपण दिलेली माहिती चुकीची असल्याचं त्याने म्हटलं. पण आता डिव्हिलियर्सने डिलिव्हरीची दिलेली बातमी खरी असल्याचं पुन्हा म्हटलं जात आहे.
विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर आहे. 22 जानेवारीपर्यंत विराट टीम इंडियासोबत (Team India) होता. पण नंतर मात्र त्याने अनुष्काच्या तब्येतीकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा विचार करत सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला.
अनुष्का शर्माच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Anushka Sharma Upcoming Movies)
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' (Chakda Xpress) हा क्रीडाविषयक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीने या सिनेमाचं शूटिंगदेखील पूर्ण केलं आहे. लवकरच हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. चाहत्यांना आता या सिनेमाची प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या