(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli And Anushka Sharma: WTC फायनलमधील भारताच्या पराभवाचं खापर नेटकऱ्यांनी फोडलं अनुष्कावर; म्हणाले...
Virat Kohli And Anushka Sharma: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला. टीम इंडियाच्या पराभवानंतर अनेक जण आता अनुष्काला ट्रोल करत आहेत.
Virat Kohli And Anushka Sharma: क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli ) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची पावर कपल अशी ओळख आहे. दोघांचा चाहता वर्ग मोठा आहे. पण काही नेटकरी सोशल मीडियावर विराट आणि अनुष्का यांना ट्रोल करत असतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला. टीम इंडियाच्या पराभवानंतर अनेक जण आता अनुष्काला ट्रोल करत आहेत.
भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पराभव झाल्यानंतर अनेकांनी अनुष्काला ट्रोल करण्यास सुरुवात केली. विराट कोहली 49 रन करुन आऊट झाला. स्टीव्ह स्मिथने त्याची विकेट घेतली. विराट आऊट झाल्यानं भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्माची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली. आता अनेक जण अनुष्काला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.
'या महिलेने क्रिकेट बघायला सुरुवात केल्यापासून भारताने एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही.' असं ट्वीट एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'ICC टूर्नामेंटमध्ये अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये उपस्थित असताना भारताचा विजय होण्याची शक्यता 0 टक्के आहे.
India has never won an ICC tournament since this woman started watching cricket pic.twitter.com/Lsqemf6SOZ
— J🏏 (@Bharatslumdog) June 11, 2023
India win % is 0 when Anushka Sharma present in the stadium in ICC tournaments. pic.twitter.com/kI0m0JpGiG
— Johns. (@joh_n_s_) June 11, 2023
Anushka Sharma knows this very well that her presence is bad luck for Team India, but still she comes to stadium so that India doesn't win any match or ICC Trophy under Rohit's captaincy !!
— Aaditya 🇮🇳 (@i_adityaawasthi) June 11, 2023
People trolling Anushka Sharma for India's loss I am already loving it.
— IshitaTiwari (@Tiwariishitaa) June 11, 2023
क्रिकेटप्रेमी भारताच्या पराभवाने दु:खी आहेत. अनुष्कामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताचा पराभव झाला, असं काही लोकांचे मत आहे. काही नेटकऱ्यांनी अनुष्काचे विविध मिम्स सोशल मीडियावर शेअर करुन तिला ट्रोल केलं आहे.
2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये तिनं मुलगी वामिकाला जन्म दिला. अनुष्का, विराट आणि वामिकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :