Virat Kohli Daughter Vamika : लंडनमध्ये विराटची लेक वामिकासोबत लंच डेट; वामिकाला पाहून नेटकरी म्हणाले...
Anushka Sharma and Virat Kohli Daughter Vamika : अकायची मोठी बहीण वामिका हीदेखील सध्या लंडनमध्ये असून तिचे आणि विराटचे फोटो व्हायरल झाले आहेत. लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये दोघेही लंच करताना दिसले.
Anushka Sharma and Virat Kohli Daughter Vamika : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी 15 फेब्रुवारी रोजी 2024 रोजी आपला दुसरा मुलगा अकायचे स्वागत केले. अकायच्या जन्माच्या पाच दिवसानंतर विराट-अनुष्काने (Virushka) ही गोड बातमी चाहत्यांना दिली. अकायची मोठी बहीण वामिका (Vamika) हीदेखील सध्या लंडनमध्ये (London) असून तिचे आणि विराटचे फोटो व्हायरल झाले आहेत. लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये दोघेही लंच करताना दिसले.
26 फेब्रुवारी 2024 रोजी विराट कोहलीच्या चाहत्यांनी विराटची मुलगी वामिका कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. वडील आणि मुलगी दोघे एका कॅफेमध्ये एकत्र जेवणासाठी गेले होते. वामिका तिच्या जेवणात व्यस्त असताना विराट फोनवर व्यस्त होता. वामिकाने नेव्ही ब्लू आणि व्हाइट चेक स्वेटर घातलेला आणि तिचे लांब केस पोनीटेलमध्ये बांधलेले दिसले.या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला असून चिमुकली वामिका किती मोठी झाली, असे प्रेमाने विचारले आहे.
View this post on Instagram
विरुष्काची दोन अपत्य, दोन नावाचा अर्थ काय?
'अकाय'चा अर्थ काय? (Akaay Meaning)
विरुष्काने 'अकाय' हे नाव खूप विचार करुन ठेवलं आहे. हिंदी शब्दकोशानुसार, 'अकाय' म्हणजे 'निराकार'. कोणताही आकार, रूप नसलेल्याला निराकार म्हणटलं जातं. 'अकाय'चा एक अर्थ चंद्राचा प्रकाश असाही होतो. एकंदरीतच विरुष्काचं आयुष्य प्रकाशमय करणारा 'अकाय' आहे.
वामिकाचा अर्थ काय? (Vamika Meaning)
विराट-अनुष्काने आपल्या पहिल्या लेकीचं नाव 'वामिका' असं ठेवलं आहे. वामिका हे नाव विराट आणि अनुष्का या दोन नावांचे एकत्रिकरण आहे. तसेच या नावाचा खास अर्थदेखील आहे. 'वामिका' या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो 'देवी दुर्गा'.
'वामिका' या नावात विराट आणि अनुष्काच्या नावाचे अक्षर देखील आहे. वामिका या नावात पहिलं अक्षर 'व' आहे. हे तिच्या वडिलांच्या म्हणजे विराट कोहलीच्या नावावरून घेण्यात आलं. यानंतर 'वामिका' नावातील शेवटचं अक्षर 'क' म्हणजे 'का'. हे तिच्या आईच्या म्हणजे अनुष्का शर्माच्या नावावरून घेण्यात आलं आहे.