(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anurag Kashyap : 'पंचायत'च्या 'विधायकजी'वर अनुराग संतापला, म्हणाला, पंकज त्रिपाठीच्या यशावर...
Anurag Kashyap On Pankaj Jha : अभिनेता पंकज झा याने नुकतच एका मुलाखतीत अनुराग कश्यपला कणाहिन दिग्दर्शक म्हटले होते. त्यावर आता दिग्दर्शक अनुराग कश्यपने पंकज झा याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Anurag Kashyap On Pankaj Jha : 'पंचायत' या वेब सीरिजमध्ये विधायकीजी व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता पंकज झा (Pankaj Jha) याने नुकतच एका मुलाखतीत अनुराग कश्यपला (Anurag Kashyap) कणाहिन दिग्दर्शक म्हटले होते. त्यावर आता दिग्दर्शक अनुराग कश्यपने पंकज झा याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अनुरागच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील सुल्तानची व्यक्तिरेखा पंकज त्रिपाठीने साकारली होती.ही भूमिका याआधी पंकज झा याला ऑफर झाली होती. मात्र, ऐनवेळी अनुरागने ही भूमिका पंकज त्रिपाठीला दिली. त्याचा उल्लेख करत पंकज झा याने अनुरागवर टीका केली होती.
इंडिया टुडेशी बोलताना अनुराग कश्यपने म्हटले की, त्यावेळी पंकज झा उपलब्ध नव्हता. तो बाहेर गेला होता. त्याच वेळी गँग्स ऑफ वासेपूरची शूटिंग सुरू करायची होती.
पंकज त्रिपाठीच्या यशाने अपसेट असेल...
अनुरागने पुढे म्हटले की, मला नेमकं आठवत नाही की त्या दिवशी वास्तविकपणे काय झाले होते. आम्ही द गर्ल इन येल्लो बुट्स या चित्रपटाची शूटिंग करत होतो. तर, पंकज झा हा पुण्यात ओशोंच्या आश्रमात गेला होता. आम्हाला गँग्स ऑफ वासेपूरची शूटिंग करायची होती आणि तो आमच्यासाठी उपलब्ध नव्हता. आमचे बजेट अतिशय मर्यादित होते आणि आम्ही त्याची वाट पाहू शकत नव्हतो. आम्ही खूपच वेगळ्या परिस्थितीमध्ये आणि बजेटमध्ये चित्रपट तयार केला. आता 20 वर्षानंतर त्याला वाटत असेल की तो पंकज त्रिपाठी होऊ शकला असता. कदाचित तो पंकज त्रिपाठीला मिळालेल्या यशामुळे अपसेट असेल असेही अनुरागने म्हटले.
पंकज झा माझा आवडीचा कलाकार....
अनुराग कश्यपने सांगितले की, मी पंकज झासोबत काम केले आहे. खरंतर तो माझ्या आवडीचा कलाकार आहे. आम्ही गुलाल आणि ब्लॅक फ्रायडेमध्ये काम केले आहे. मला त्याच्यासोबत पुन्हा एकदा काम करायला आवडेल असे त्याने म्हटले. मात्र, त्याच्यापर्यंत पोहचणे कठीण असते असेही अनुरागने म्हटले.
View this post on Instagram
अनुराग कश्यप लवकरच बॅड कॉप या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. यामध्ये तो निगेटिव्ह रोल साकारणार आहे. त्याशिवाय, विजय सेतुपतीची भूमिका असलेल्या 'महाराजा' चित्रपटात झळकणार आहे.