Antim : सलामान खान, आयुष शर्मा आणि महेश मांजरेकर 'अंतिम'च्या प्रमोशनसाठी पुण्याला रवाना
सलमान खान, आयुष शर्मा, महिमा मकवाना यांच्यासह दिग्दर्शक महेश मांजरेकर अंतिमच्या प्रमोशनसाठी पुण्याला रवाना झाले आहेत.
Antim : The Final Truth : सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्माच्या (Aayush Sharma) 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमाच्या प्रमोशनसाठी महेश मांजरेकर पुण्याला रवाना झाले आहेत. अंतिम सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले होते. येत्या 26 नोव्हेंबरला 'अंतिम' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'अंतिम : द फायनल ट्रुथ' हा सिनेमा 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हिंदी रिमेकमध्येदेखील पुणे शहरातील अनेक दृश्ये शूट केली आहेत. त्यामुळेच सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान खान, आयुष शर्मा आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर पुण्याला रवाना झाले आहेत. 'अंतिम' सिनेमात सलमान खान एका शूर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे.
मांजरेकरांची आता कर्करोगापासून झाली सुटका
महेश मांजरेकरांना अंतिम सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटच्या काळात कर्करोग झाल्याचे समजले होते. त्यानंतर त्यांनी केमोथेरपी सुरू केली. दरम्यान त्यांनी 35 किलो वजन कमी केले. आता कर्करोगापासून सुटका झाल्याने मांजरेकरांना आनंद होत आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मांजरेकर केमीओथेरपी करत होते. पण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्जरी केली. आवडीचं काम करत असल्याने मांजरेकरांना शूटिंग आणि कर्करोगावर मात करणं सोपं गेलं.
संबंधित बातम्या
Mr And Mrs Mahi : Rajkummar Rao आणि Janhvi Kapoor चा 'मिस्टर अॅंड मिसेस माही' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Jersey Trailer : Shahid Kapoor च्या 'जर्सी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
Atrangi Re Trailer : Akshay Kumar, Sara Ali Khan आणि Dhanush च्या आगामी सिनेमाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Antim Release Date: आरररर खतरनाक! सलमान खानचा 'अंतिम' चित्रपट या दिवशी होणार रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha