Ankita Lokhande Wedding: अंकिता लोखंडेचे 'शुभमंगल सावधान' ठरलं, डेस्टिनेशन वेडिंग नव्हे तर या शहरात पार पडणार लग्नसोहळा
Ankita Lokhande Wedding: अंकिता लोखंडे डिसेंबरमध्ये विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिताचे डेस्टिनेशन वेडिंग न होता एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये लग्न पार पडणार आहे.
Ankita Lokhande Wedding Plan: छोट्या पडद्यावरची अंकिता लोखंडेचे या वर्षात विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांच्या लग्नाची तारिख आणि ठिकाणदेखील ठरले आहे. अंकिताने तिच्या लग्नाचा खास प्लॅन बनवला आहे. इतर बड्या कलाकारांसारखे अंकिता डेस्टिनेशन वेडिंग करणार नाही. तर अंकिताचा लग्नसोहळा मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडणार आहे.
अंकिताचे डेस्टिनेशन वेडिंग होणार नाही
अंकिता लोखंडे आणि विकी जैन मागील अनेक दिवसांपासून एकत्र आहेत. त्यानंतर त्यांनी त्यांच नातं आणखी पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दोघांचे येत्या डिसेंबरमध्ये लग्न होणार आहे. त्यांचा लग्नसोहळा 12,13,14 डिसेंबरला पार पडणार आहे. अंकिताचे ग्रॅंड रॉयल डेस्टीनेशन वेडिंग होणार नाही. अंकिताच्या मते,"डेस्टीनेशन वेडिंग हा आता स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. त्यात बराच पैसा वाया जातो".
Bigg Boss 15: बिग बॉस 15 च्या मंचावर Salman Khan ने म्हटले 'हम आपके है कौन' सिनेमातील डायलॉग
अंकिताने तिच्या लग्नाचा खास प्लॅन बनवला आहे. तिने दुसऱ्या शहरात लग्न करायला नापसंती दर्शवली आहे. अंकिताला तिचे लग्न साध्या पद्धतीने करायचे आहे. त्यामुळे अंकिताचा लग्नसोहळा मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे.
View this post on Instagram
अंकिता-विकीची खास मैत्री
विकी कौशल आणि कतरिना कैफ, राजकुमार राव आणि पत्रलेखासोबत अंकिता लोखंडे आणि विकी कौशलच्या लग्नाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहेत. डिसेंबर महिना हा बॉलिवूडसाठी लग्नाचा महिनाच असणार आहे. अंकिता सोशलमीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. सोशलमीडियावर अंकिता विकीसोबतचे फोटोदेखील शेअर करत असते. त्या फोटोंमधून दोघांच्या मैत्रीचा अंदाज येतो. त्यांचे फोटो त्यांच्या चाहत्यांच्यादेखील पसंतीस पडत असतात.