एक्स्प्लोर

एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने यांच्या बाजूने : अनिता दाते 

अनिता दाते (Anita Date) यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. कोणतेही कारण न देता कामावरून बाजूला करणे हे चुकीचे असल्याचे सांगत किरण माने यांना अनिता दाते यांनी पाठिंबा दर्शवला आहे. 

मुंबई : राजकीय भूमिका घेतल्याने स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना काढल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ अनेक जण बोलू लागले आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसने किरण माने यांची बाजू घेतली होती. आता माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील मुख्य अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) यांनी कोणतेही कारण न देता कामावरून बाजूला करणे हे चुकीचे असल्याचे सांगत किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे. 

अनिता दाते यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. दाते यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कोणत्याही अभिनेत्याला/अभिनेत्रीला आगाऊ कल्पना न देता अथवा कोणतीही समज न देता अथवा कोणतेही कारण न देता कामावरून बाजूला करणे चुकीचे आहे. अशा निर्मिती संस्था आणि चॅनलने त्या कलाकाराला कामावरून काढण्याचे योग्य कारण देण्याचे सौजन्य दाखवले पाहिजे. अशा व्यवस्थांचा मी निषेध करते, असे दाते यांनी म्हटले आहे.

"व्यवस्था समजून घेणे, व्यवस्थेला प्रश्न विचारणे, आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीने मांडता येणे ही खरंतर चांगली गोष्ट आहे, असंच मी मानते. त्याबाबत किरण माने यांचे कौतुक आहे. एखाद्या व्यक्तीची पोस्ट समजून घेण्याऐवजी त्याची गळचेपी करणे हे चुकीचे आहे. आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालू शकतो. चर्चा करू शकतो. मात्र, त्याचं तोंड बंद करणे, त्याला धमकावणे, त्याच्या व्यवसायावर, कामावर टाच आणणे हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध व मागास असल्याचे लक्षण आहे" असे अनिता दाते  यांनी म्हटले आहे. 

एका मुलाखतीमध्ये किरण यांनी सांगितले होते की, माझ्या राजकीय भूमिकेमुळे मला मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं आहे. त्यानंतर किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ' काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !' किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.

महत्वाच्या बातम्या

कलाकारांची मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही; किरण माने यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात

 

महत्त्वाच्या बातम्या

Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
Anurag Kashyap on Diljit Dosanjh: 'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
Junior Artist Sanjeeb Singh: TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Raj Thackeray on RJ Malishka: 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Embed widget