Animal OTT Release : बॉक्स ऑफिस गाजवणारा 'अॅनिमल' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल
Animal Movie : रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' हा सिनेमा लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.
Animal Release On OTT : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांचा 'अॅनिमल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. सिनेमा पाहिल्यानंतर रणबीरचे चाहते त्याच्या अभिनयाचं कौतुक करत आहे.
'अॅनिमल' ओटीटीवर होणार रिलीज? (Animal OTT Release)
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, 'अॅनिमल' हा सिनेमा 2024 च्या सुरुवातीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने 'अॅनिमल'चे ओटीटी राईट्स विकत घेतले असल्याची चर्चा आहे. थिएटरमध्ये न दाखवलेले सीन ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"रणबीर कपूर तुमच्या डोळ्यात पाहत आहे. हीच पोस्ट आहे..तुमचं स्वागत".
'अॅनिमल'चं कथानक काय आहे? (Animal Movie Story)
संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) 'अॅनिमल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 'अॅनिमल' हा सिनेमा वडील-मुलाच्या नात्याभोवती फिरणारा आहे. रणविजय अर्थात रणबीर हा या सिनेमात हिरो आहे. वडिलांवर त्याचं खूप प्रेम आहे. वडिलांचं प्रेम मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.
'अॅनिमल' या सिनेमाला सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशनने 'ए' सर्टिफिकेट दिलं आहे. 'अॅनिमल' हा सिनेमा 3 तास 21 मिनिटांचा आहे. 'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूर अभिनीत या सिनेमात बॉबी देओल (Bobby Deol) खलनायकाच्या भूमिकेत आहे. रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अनिल कपूर (Anil Kapoor), तृप्ती डिमरी (Tripti Dimri) हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
View this post on Instagram
अॅनिमलचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.. (Animal Box Office Collection Day 10)
पहिला दिवस : 63.8 कोटी
दुसरा दिवस : 66.27 कोटी
तिसरा दिवस : 71.46 कोटी
चौथा दिवस : 43.96 कोटी
पाचवा दिवस : 30.39 कोटी
सहावा दिवस : 24.23 कोटी
सातवा दिवस : 24.23 कोटी
आठवा दिवस : 22.95 कोटी
नववा दिवस : 34.74 कोटी
दहावा दिवस : 37 कोटी
एकूण कमाई : 432.27 कोटी
संबंधित बातम्या