एक्स्प्लोर

Animal Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर रणबीरचं राज्य! 'अ‍ॅनिमल'ने रिलीजच्या दोन दिवसांत केली 100 कोटींपेक्षा अधिक कमाई

Animal Box Office Collection : अभिनेता रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.

Ranbir Kapoor Animal Box Office Collection Day 2 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीज होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. एकंदरीतच बॉक्स ऑफिसवर रणबीरचं राज्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. 'अॅनिमल' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने रोमँटिक हिरोची इमेज ब्रेक केली आहे. 

'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.. (Animal Box Office Collection)

'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजआधीपासून चर्चेत असणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच या सिनेमाने छप्परफाड कमाई केली होती. रिलीजच्या पहिल्या दिवशी दिवशी अर्थात ओपनिंग डेला 'अॅनिमल'ने 63.8 कोटीची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 66 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या दोन दिवसांत 'अॅनिमल'ने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. दोन दिवसांत या सिनेमाने 129.80 कोटींची कमाई केली होती. 

'अॅनिमल'ने तोडला 'जवान'चा रेकॉर्ड

'अॅनिमल' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 'अॅनिमल' या सिनेमाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 66 कोटींची कमाई केली होती. तर 'जवान'ने (Jawan) दुसऱ्या दिवशी 53.23 कोटींची कमाई केली होती. 'गरद 2','टायगर 3' या सिनेमांपेक्षाही अॅनिमलची कमाई अधिक आहे.

'अॅनिमल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी सांभाळली आहे. वडील-मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा 'अॅनिमल' हा सिनेमा आहे. या सिनेमात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि बॉबी देओल (Bobby Deol) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

'अॅनिमल' अन् 'Sam Bahadur'ची टक्कर

'अॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होत आहेत. रणबीर आणि विकी कौशल बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आले आहेत. 'अॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' हे दोन्ही वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे असून दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 

'या' साईट्सवर 'अॅनिमल' लीक

मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर-रश्मिकाचा 'अॅनिमल' हा सिनेमा फिल्मीवैप (Filmywap), तामिळ रॉकर्स (Tamil Rockers) आणि फिल्मीजिला (Filmyzilla) या साईट्सवर लीक झाला आहे. या सर्व साईट्सवर हा सिनेमा HD क्वालिटीमध्ये लीक झाला आहे. सिनेमा लीक झाल्याने 'अॅनिमल'ची टीम हैरान झाली आहे. सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने सिनेमाच्या कमाईवर नक्कीच याचा परिणाम होणार आहे.

संबंधित बातम्या

Animal Leak : रणबीरला मोठा फटका! 'अ‍ॅनिमल' रिलीज होताच ऑनलाईन लीक; निर्मात्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Embed widget