Animal Box Office Collection: बाहुबली, पठाण अन् जवानला टाकलं मागे; 'अॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, सहाव्या दिवशी केली एवढी कमाई
Animal Box Office Collection: अॅनिमल चित्रपटानं सहाव्या दिवशी देखील काही चित्रपटांचे रेकॉर्ड्स तोडून बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात अॅनिमल या चित्रपटाचं सहाव्या दिवसाचं कलेक्शन...
Animal Box Office Collection: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. अॅनिमल चित्रपटानं सहाव्या दिवशी देखील काही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात अॅनिमल या चित्रपटाचं सहाव्या दिवसाचं कलेक्शन...
Sacnilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, अॅनिमल या चित्रपटानं रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी 30.00 कोटी रुपये कमवले आहेत. आता या चित्रपटानं भारतात 300 कोटींचा टप्पा ओलांडला असून सहा दिवसात या चित्रपटानं 312.96 कोटींची कमाई केलेली आहे.
पहिला दिवस - 63.8 कोटी
दुसरा दिवस - 66.27 कोटी
तिसरा दिवस - 71.46 कोटी
चौथा दिवस - 43.96 कोटी
पाचवा दिवस - 37.47 कोटी
सहावा दिवस-30.00 कोटी
एकूण कमाई - 312.96 कोटी
बाहुबली, पठाण अन् जवानला टाकलं मागे
रणबीरच्या 'अॅनिमल' या चित्रपटानं रिलीजच्या सहाव्या दिवशी 30 कोटींचे कलेक्शन करुन शाहरुख खानच्या पठाण आणि जवानटा तसेच बाहुबली 2 चा चे रेकॉर्ड मोडला आहे. अभिनेता प्रभासच्या 'बाहुबली 2' या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी कलेक्शन 26 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी 25.5 कोटी कमाई केली होती. तर 'जवान' चित्रपटाने सहाव्या दिवशी 24 कोटींची कमाई केली होती.
View this post on Instagram
'अॅनिमल' या सिनेमाला सेन्सॉरने 'A' सर्टिफिकेट दिलं. या चित्रपटामधील अॅक्सन सीन्सचं अनेकजण कौतुक करत आहेत. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात रणबीरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.तृप्ती डिमरीने देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.
'अॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झाला. या चित्रपटामधील सतरंगा, अर्जन व्हेली या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच या चित्रपटातील एका सीनमध्ये डॉल्बी वाल्या या मराठमोळ्या गाण्याचा वापर देखील करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या: