एक्स्प्लोर

Anil Kapoor : अनिल कपूरची नवी भूमिका; 'छावा' सिनेमात दिसणार औरंगजेबाच्या भूमिकेत

Chhava : 'छावा' या सिनेमात अनिल कपूर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Anil Kapoor Play Role Aurangzeb in Chhava : 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सध्या त्यांच्या आगामी 'छावा' (Chhava) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. विकी कौशल (Vicky Kaushal) आणि 'रश्मिका मंदाना' (Rashmika Mandanna) या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या सिनेमासाठी अनिल कपूर (Anil Kapoor) यांना विचारणा झाली असून ते औरंगजेबाच्या (Aurangzeb) भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे.

'छावा' या सिनेमातील औरंगजेबाच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी अनिल कपूर यांना विचारणा झाली असल्याचं समोर आलं आहे. 'छावा' या सिनेमाच्या टीमने याआधीही अनिल कपूर यांना विचारणा केली आहे. त्यामुळे अनिल कपूर आता विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसतील.

View this post on Instagram
 
A post shared by anilskapoor (@anilskapoor)

'छावा' कादंबरीवर आधारित सिनेमा...

'छावा' हा पीरिअड ड्रामा असणार आहे. या सिनेमात विकी कौशल संभाजी महाराजांच्या तर रश्मिका त्यांच्या पत्नीच्या अर्थात येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे.  मराठ्यांचा गौरव आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विकी कौशल आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. 

'छावा' या सिनेमाच्या शूटिंगला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे. 2024 पर्यंत या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. मुंबई, वाई, भोर, जयपूर आणि महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. 

विकी कौशलचे यावर्षात 'जरा हटके जरा बचके' आणि 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता त्याचा 'सैम बहादुर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आता अभिनेता त्याच्या आगामी 'छावा' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 14 ऑक्टोबरपासून या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार असल्याचा अंदाज आहे. 

'छावा' या सिनेमासाठी विकी कौशलने 10 ते 12 किलो वजन कमी केलं आहे. 14 ऑक्टोबरपासून पुढचे 100 ते 150 दिवस 'छावा' सिनेमाचं शूटिंग सुरू राहणार आहे. 'छावा' या सिनेमासह विकीला 'बब्बर छेर' या सिनेमासाठीही विचारणा झाली आहे. 

संबंधित बातम्या

Chhava The Great Warrior : 'छत्रपती संभाजी महाराज' ग्रंथावर आधारित 'छावा-द ग्रेट वॉरिअर' सिनेमा लवकरच प्रदर्शित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget