Thar : नेटफ्लिक्सवर बाप-लेक आमने-सामने, 'थार'मध्ये अनिल कपूरसोबत दिसणार हर्षवर्धन कपूर
Netflix : नेटफ्लिक्सवर लवकरच 'थार' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अनिल कपूरसोबत हर्षवर्धन कपूरदेखील दिसणार आहे.
Netflix's Thar : नेटफ्लिक्सने नुकतीच त्यांच्या आगामी 'थार' (Thar) सिनेमाची घोषणा केली आहे. 'थार' सिनेमाची घोषणा करत त्यांनी सिनेमातील कलाकारांचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोत अनिल कपूरचा मुलगा आणि सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूरदेखील दिसतो आहे. त्यामुळेच 'थार' सिनेमात अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूरसह सतीश कौशिकदेखील या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनिल कपूर आणि सतीश कौशिक या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा नेमका कधी प्रदर्शित होणार यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
View this post on Instagram
अनील कपूर याआधी 'एके वर्सेज़ एके' सिनेमात अनुराग कश्यपसोबत दिसला होता. हर्षवर्धनदेखील याआधी नेटफ्लिक्सच्या 'रॉय' सीरिजमध्ये दिसला होता. या सीरिजमध्ये हर्षवर्धनने सुपरस्टारची भूमिका साकारली होती.
संबंधित बातम्या
Upcoming Movies on OTT: 'बच्चन पांडे' ते 'गंगूबाई काठियावाडी' पर्यंत 'हे' सिनेमे होणार ओटीटीवर प्रदर्शित
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचा ट्रेलर आऊट, 11 मार्चला सिनेमा होणार प्रदर्शित
Me Vasantrao : 'मी वसंतराव' ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला ; एक एप्रिल रोजी होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha