Anek On Netflix : 'अनेक'ने 'भूल भुलैया 2'ला टाकलं मागे; नेटफ्लिक्सवर आयुष्मान खुराना अव्वल स्थानी
Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानाचा 'अनेक' हा सिनेमा आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
Anek On Netflix : बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'अनेक' (Anek) हा सिनेमा नुकताच 'नेटफ्लिक्स' (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. सध्या हा सिनेमा ट्रेडिंगमध्ये असून या सिनेमाने कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या सिनेमालादेखील मागे टाकलं आहे.
'अनेक' हा सिनेमा मोठ्या पडद्यावर जादू दाखवण्यात कमी पडला होता. पण, नेटफ्लिक्सवर हा सिनेमा अव्वल स्थानी आहे. नेटफ्लिक्सवर ट्रेडिंग होणाऱ्या सिनेमांच्या यादीत 'अनेक' हा सिनेमा पहिल्या स्थानावर आहे. अनुभव सिन्हाने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळेच या सिनेमाने याआठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'भूल भुलैया 2'चा रेकॉर्ड मोडला आहे. हा सिनेमा 26 जूनला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता.
View this post on Instagram
'अनेक'ने बॉक्स ऑफिसवर केली 12 कोटींची कमाई
'अनेक' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई केली नाही. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने फक्त 12 कोटींचा गल्ला जमवला आहे. पण नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे हा सिनेमा सध्या धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा 27 मे रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता.
'अनेक' बॉक्स ऑफिसवर ठरला फ्लॉप
आयुष्मान खुरानाच्या 'अनेक'चे बजेट 80 कोटी होते. पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. त्यामुळेच हा सिनेमा फ्लॉप झाला. 27 मे रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर एका महिन्याच्या आत हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. 80 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त 12 कोटींची कमाई केली होती.
संबंधित बातम्या