एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बिग बींबद्दलच्या 'त्या' ट्वीटनंतर फ्लिंटॉफचं स्पष्टीकरण
मुंबई : ट्विटरवरील एका बनावट कमेंटमुळे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंन्टॉफ याला अमिताभ बच्चन यांच्याविषयी ट्वीट करुन स्पष्टीकरण द्यावं लागलं. ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये, वेस्ट इंडीजकडून पराभूत झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी नर्मविनोदातून इंग्लंडला परतीचं तिकीट बुक करण्याचा सल्ला दिला होता.
पण त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अँड्र्यू फ्लिंटॉफच्या कथित ट्वीटमुळे खळबळ माजली. त्या ट्वीटमध्ये 'आमच्या तिकीटापेक्षा तुम्हालाच पनामाची तिकीटं बुक करावी लागतील' असा टोला लगावण्यात आला होता.
पण काही तासातच अँड्र्यू फ्लिंटॉफने ट्वीट केलं. तो कथित ट्वीट माझा नसून बनावट असल्याचं स्पष्टीकरण त्याने दिलं आणि या प्रकरणावर पडदा टाकला.
https://twitter.com/flintoff11/status/717690446047223808
दरम्यान, पनामा पेपर्समध्ये मागील दोन दिवसांपासून अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचं नाव गाजत आहे. त्यामुळे अवघ्या सोशल मीडियामध्ये फ्लिंटॉपच्या ट्वीटमुळे खळबळ माजली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement