![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ananya Panday : अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
Alanna Panday Gave Birth To A Son : अनन्याची चुलत बहीण आणि चंकी पांडेची पुतणी अलाना पांडे हिला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. अलाना पांडे ही मागील वर्षी मार्च महिन्यात आयवर मॅक्रेसोबत विवाहबद्ध झाली होती.
![Ananya Panday : अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन Ananya Panday Welcomes Nephew As Sister Alanna Panday Gave Birth To A Son Chunky Panday become grandfather Ananya Panday : अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/5f41aa9a9798e38c5d39dabc0b1ce40f1720426139372290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अलाना आणि इव्होर यांनी काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करून त्यांनी गुड न्यूज दिली. या जोडप्याने आता एका सुंदर मुलाचे स्वागत केले आहे. त्यांनी सोमवारी सकाळी एक व्हिडिओ शेअर करत मुलगा झाला असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये अलाना, इव्हर आणि नवजात बाळही दिसत आहे.
व्हिडीओवर अलानाने कमेंट करून सांगितले की, आमचा एंजल इथे आहे...तर, अनन्याने हा व्हिडीओ शेअर करत माझा सुंदर भाचा इथे आहे, असे म्हटले.
अलाना पांडेने दिला बाळाला जन्म
View this post on Instagram
अलाना आणि इव्होर यांनी गर्भलिंगनिदान चाचणी केली होती. बेबी शॉवर थीम सर्व ब्लू कलरची थीम होती. अनन्याचा कथित बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरसह अनेक सेलिब्रिटी बेबी शॉवरमध्ये सहभागी झाले होते. परदेशात काही नियमांच्या अधीन राहून गर्भलिंगनिदान चाचणी केली जाते.
View this post on Instagram
लग्नात किंग खानने लावली होती हजेरी...
बेबी शॉवरमध्ये गौरी खान, बिपाशा बसू, करण सिंह ग्रोव्हर, शनाया कपूर, महिप कपूर सारखे अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अलाना एक सोशल मीडिया इन्फ्लूएंसर आहे. मागील वर्षी झालेल्या तिच्या लग्नात शाहरुख खानने हजेरी लावली होती. स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)